‘RRR’ first review | ‘RRR..’खतरनाक , Ram charan, Jr NTR यांचा फुल पैसा वसूल परफॉर्मन्स

| Updated on: Mar 25, 2022 | 9:58 AM

गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट 'रौद्रम रणम रुधिरम' म्हणजेच 'RRR' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

RRR first review | RRR..खतरनाक , Ram charan, Jr NTR यांचा फुल पैसा वसूल परफॉर्मन्स
RRR
Follow us on

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR‘ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट RRR (Rise Roar Revolt) 25 मार्च 2022 (25 March 2022) रोजी रिलीज झाला आहे. सध्या या चित्रपटाचे तेलुगू व्हर्जन समोर आले आहे त्या रिव्ह्यूनुसार, ‘RRR’ चित्रपटाने तेलुगू प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सुमारे आठ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने समिक्षकांची मनेच जिंकली आहेत. या चित्रपटामध्ये राजामौली यांनी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण (Ram charan)आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) याच्या प्रमुख भुमिकेत भारताचा प्रेरणादायी सुवर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडणार

काही समिक्षकांच्या मते हा चित्रपट बाहुबली 2 चा रेकॉर्ड तोडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चित्रपटात साऊथ सिनेसृष्टीतील दोन मोठे स्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात राम चरण यांनी स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ची भूमिका साकारली आहे. तर, साऊथचा अॅक्शन स्टार ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भटने सीतेची भूमिका साकारली आहे, तर अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्व रेकॉड मोडण्यासाठी हा चित्रपट सज्ज झाला आहे. असेच वाटत आहे.

एस. एस. राजामौलीची (rajamouli ss)पोस्ट

या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी भारतीय सिनेमाची जादू २५ मार्चपासून #RRRMovie… तुमच्या भेटीला असं म्हणत एस. एस. राजामौलीची यांनी त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.

काय म्हणतात नेटकरी

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटाची चर्चा जोरात आली आहे. आता या चित्रपटाबद्दल लोकांची मते समोर येऊ लागली आहेत. आता या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यूही आला आहे. त्यानुसार या चित्रपट पूर्वार्धात लोकांना फारसा आवडला नाही पण उत्तरार्धात या चित्रपटाने आपला रंगच बदलून टाकला. असे सर्वांचे म्हणणे आहे. नेटकऱ्यांमध्ये या चित्रपटाला घेऊन पहिल्या पासूनच उत्सुकता होती. आता या चित्रपटाला घेऊन इंटरनेटवर मीमस् व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये राम चरण यांच्या कामचे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. त्यांचा तुलना अपरीचीत चित्रपटासोबत केलेली पाहायला मिळत आहे.

तर काही नेटकऱ्यांनी #RRRreview 5/5? म्हणत कमी शब्दात सर्वकाही सांगून टाकले आहे.

काय आहे IMDb Rating

या बहूचर्चित चित्रपटाला IMDb ने 10 पैकी 9.2 स्टार्स देत आधीच सुपर हिट घोषीत केल्याचे दिसत आहे. हा चित्रपट नवीन रेकॉर्ड करणार यात काही वादच नाही.

RRR IMDb

चित्रपटाचे कथानक :

हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली, तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ब्रिटिश काळातील या दोन नायकांच्या शौर्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक राजामौली यांनी 5 वर्षांपूर्वी RRR हा तमिळ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

Urfi javed : हा जाळणारा उन्हाळाही उर्फीच्या कपड्यांसमोर फिका, सगळी ‘हिरवाई’एकाच फोटोत

Esra Bilgic: ‘लाज वाटली पाहिजे तुला’ म्हणत पाकिस्तानी युजर्सनी अभिनेत्रीला ‘ब्रा’च्या जाहिरातीवरून केलं ट्रोल

‘अभिषेक, तूच माझा उत्तराधिकारी, बस कह दिया तो कह दिया’; ट्रोलर्सना Amitabh Bachchan यांचं सणसणीत उत्तर