आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिक मर्चंट यांचा पुढल्या महिन्यात विवाह असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तर त्यांची लाडकी लेक, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची डायरेक्टर ईशा अंबानी -पिरामल हीदेखील चर्चेत आली आहे. IVF वरून होणाऱ्या चर्चांवर अखेर ईशाने मौन सोडलं आहे. तिच्या जुळ्या मुलांचा जन्म हा आयव्हीएफ (IVF) द्वारे झाल्याचं ईशाने नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. एवढंच नव्हे तर ईशाची आई, नीता अंबानी याही आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारेच आई बनल्या होत्या, त्याचा उल्लेखही ईशाने केला. मुकेश अंबानी यांची लेक नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊया.
एका नामांकित मॅझीनला दिलेल्या मुलाखतीत ईशा अंबानीने स्पष्ट केलं की ती आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे आई बनली. त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नसल्याचंही ईशाने सांगितलं. तिची आई, नीता अंबानी ही देखील या तंत्रज्ञानाद्वारेच आई बनली. त्यावेळी ईशा अंबानी आणि तिचा जुळा भाऊ आकाश या दोघांचा जन्म झाला.
ही अतिशय कठीण प्रोसेस
मला आयव्हीएफद्वारे (IVF) जुळ्या मुलांची गर्भधारणा झाली आणि मी त्यांना जन्म दिला, हे सांगण्यात मला लाजिरवाणं असं काहीच वाटत नाही, असं ईशा म्हणाली. ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मी बरोबर म्हणत्ये ना ? यात लपवण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखंही काही नाही. ही अतिशय कठीण प्रोसेस असते. जेव्हा तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करता, आयव्हीएफद्वारे कन्सिव्ह करता, तेव्हा त्यामुळे तुम्हाला खूप शारीरिक थकव्याचा सामना करावा लागत, असं ईशाने स्पष्ट केलं.
काही लोकांच्या मनात IVF बद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून जन्माला आलेल्या मुलांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. जर मुलांसाठी या जगात मॉर्डन (आधुनिक) टेक्नॉलॉजी आली आहे, तर त्याचा अवलंब करण्यास हरकत काय ? असा सवाल ईशाने विचारला. हे तर औत्सुक्याचं आहे. यात लपवण्यासारखं निश्चितच काही नाहीये, याचा पुनरुच्चार ईशाने केला.
ईशा अंबानी च्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर 12 डिसेंबर 2018 साली उद्योगपती आनंद पिरामल याच्याशी तिचा धूमधडाक्यात विवाह झाला. ते दोघेही मुंबईतील वरळी येथील एका आलिशान घरात राहतात. दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं आहेत. 19 नोव्हेंबर 2022 साली आई बनलेल्या ईशाच्या मुलांची नावं कृष्णा आणि आदिया अशी आहेत.
नीता अंबानी यांनीही दिला होता जुळ्या मुलांना जन्म
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना तीन मुलं आहेत. नीता या पहिल्यांदा आईबनल्या तेव्हा 23 ऑक्टोबर 1991 साली त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. आकाश आणि ईशा हे दोघेही जुळे भाऊ-बहीण आहेत. तर त्यानंतर काही वर्षांनी अनंत अंबानी याचा जन्म झाला.