बोलताना जरा भान बाळगा.. झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना

| Updated on: Apr 20, 2024 | 3:07 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री असलेल्या झीनत अमान यांनी काही दिवसांपूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपबाबत वक्तव्य केले होते. त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच जणांना पटलं नाही, काही स्टार्सनी तर पुढे येऊन त्यांच्या विधानाचा निषेधही केला. अभिनेत्री मुमताज यांनीही झीनत अमान यांच्या विधानाचा समाचार घेत टीका केली होती. आता अभिनेते मुकश खन्ना यांनीदेखील झीनत अमान यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या जीवनशैलीवरही भाष्य केलं.

बोलताना जरा भान बाळगा.. झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना
झीनत अमान यांच्या लिव्ह-इनच्या कमेंटवर भडकले मुकेश खन्ना
Follow us on

दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तरुणाईला लिव्ह-इन रिलेशनशिपबाबच सल्ला दिला होता. एकमेकांना नीट समजून घेता यावं यासाठी तसंच नातं मजबूत व्हाव यासाठी लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये रहाव असा सल्ला झीनत अमान यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिला होता. मात्र त्यांच्या या विधानामुळे मोठा गदारोळ माजला. त्यांचं हे वक्तव्य बऱ्याच जणांना पटलं नाही, काही स्टार्सनी तर पुढे येऊन त्यांच्या विधानाचा निषेधही केला. दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनाही लग्न न करता एकत्र राहण्याचा हा सल्ला काही पटला नाही. त्यांनी झीनत अमान यांच्यावर टीका केली. आता ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हेही झीनत अमान यांच्या वक्तव्यामुळे भडकले असून त्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

बोलताना जरा विचार करा की..

मुकेश खन्ना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. झीनत अमान यांच्या या विधानाबद्दल बोलताना मुकेश खन्ना यांनी त्यांच्या जीवनशैलीबद्दल भाष्य केले. अलीकडेच एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी त्यांचं मत मांडलं. झीनत अमान यांच्या जीवनशैलीवर भाष्य करताना ते म्हणाले की , झीनत या सुरुवातीपासूनच पाश्चात्य संस्कृतीनुसार त्यांचे जीवन जगत आहे. पुढे ते म्हणाले की –
“आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात लिव्ह-इन संबंधांना मान्यता नाही. ते वेस्टर्न सिव्हीलायजेशनमधून आलं आहे. झीनत अमान या जे काही बोलल्या आहेत, त्यांनी त्यांच आयुष्य नेहमी वेस्टर्न सिव्हिलायझेशन नुसार जगले आहे. लग्नाशिवाय एक मुलगा आणि मुलगी पती-पत्नी म्हणून एकत्र राहणे मान्य नाही. अस विधाना करताना जरा भान बाळगलं पाहिजे, विचारपूर्वक बोललं पाहिजे”, अशी टीका मुकेश खन्ना यांनी केली.

हे सुद्धा वाचा

एवढंच नव्हे तर मुकेश खन्ना यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे होणाऱ्या समस्यांबाबतही चिंता व्यक्त केली. लग्नाआधी मुलगा आणि मुलगी पती-पत्नीसारखे एकत्र राहिले तर त्यांचं काय होईल आणि या काळात त्यांच्याकडून काही चूक झाली तर काय होईल ? असा प्रश्न मुकेश खन्ना यांनी उपस्थित केला.