‘प्रेमास रंग यावे’, ‘सुंदरी’ या दोन्ही मालिका आता नव्या वळणावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सन मराठीवरील मालिकेच्या महासंगम विशेष भागात घडणार आहे. यात सुंदर, सुंदरी आणि धनजंयचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. या अपघातानंतर धनंजयच्या आयुष्यात काय बदल होणार? कोण जगणार अन् कोणाचा जीव जाणार हे मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. येत्या 27 मे रोजी रात्री 9. 30 वाजता ‘प्रेमास रंग यावे’ आणि ‘सुंदरी’ या मालिकांचा महासंगम घडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
सुंदरी मालिकेत सुंदरी आणि सुंदर अक्षराच्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून तिला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील येणा-या संकटाला आमंत्रण देत आहे याची त्याना कल्पनाच नसते. अक्षराच्या बहिणीची सुरक्षा करण्याचा निर्णय त्यांच्याच जीवावर बेतावा म्हणून अश्विन त्यांचा अपघात घडवण्याच्या तयारीत असतो आणि दुर्देवाने त्याच्या प्रयत्नाना यश येऊन सुंदरी, धनजंय आणि सुंदर यांचा अपघात होतो. या अपघातात कोण वाचणार आणि कोणाचा जीव जाणार हे महासंगम विशेष भागात पाहायला मिळेल.
चांगल्या कामासाठी उचललेलं पाऊल नेमकं कोणत्या वळणावर पोहचणार किंवा त्या वळणावर नेमक्या कशाप्रकारे अडचणी येणार यांचा अंदाज कोणालाच नसतो. शेवटी नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. सन मराठी वरील सुंदरी मालिका आता वेगळ्या टप्प्यावर पोहचणार आहे. आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आले आणि मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना स्वत:शी जोडून ठेवलं. आता पुन्हा एकदा या मालिकेत अशी घटना घडणार आहे. ज्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न आपसूक प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होईल.
अपघातामुळे मालिका कोणत्या वळणावर पोहचणार? या संकटातून बाहेर निघायचा मार्ग काय असेल आणि कसा असेल? हे सगळं जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला ‘प्रेमास रंग यावे’ आणि ‘सुंदरी’ मालिकेचा महासंगम पाहावा लागणार आहे. सोमवारी 27 मे ला रात्री 9. 30 वाजता तुम्हाला सन मराठीवर पाहायला मिळणार आहे.