बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याला यशस्वी अभिनेता म्हटले जाते. त्याने ओमकारा चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती. आतापर्यंत त्याने निरनिराळ्या भूमिका केल्या आहेत. त्याच्या करियरमधील यशस्वी चित्रपटाचा विचार केला तर रेस हा चित्रपट म्हटला जातो. या चित्रपटाचा पहिला भाग खूपच यशस्वी झाला होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने देखील मोठे कलेक्शन केले होते. रेस – 3 मध्ये सलमान खान ही मॅजिक रिपीट करु शकला नाही. परंतू तरीही नफा मिळविलाच. आता सैफ अली खान याचा नवा चित्रपट रेस-4 येत असून यात हिरोईन म्हणून मराठीतील एका गुणी अभिनेत्रीला संधी मिळणार आहे.
सध्याच्या काळात बॉलीवूडमध्ये कोणाची चलती आहे म्हटले तर तृप्ती डीमरी आणि शर्वरी वाघ या दोघींचे नाव पुढे आहे. मुंज्या चित्रपटाने चर्चेत आलेल्या शर्वरी वाघ हिला सैफ अली खान सोबत मोठा चित्रपट मिळला आहे. या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तर या दोन्ही अभिनेत्री खूपच टॅलेंटेड असून मेकर्स यांना घेऊन ‘रेस – 4’या चित्रपटाची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात बोलणी अंतिम स्थितीत आहेत. या चित्रपटाच्या अंतिम कास्ट बाबत लवकरच कन्फर्मेशन होणार आहे.
रेस हा चित्रपट साल 2008 मध्ये आला होता. या चित्रपटाने तेव्हा 103 कोटीची कमाई केली होती. हा रेकॉर्ड म्हटला जात होता. त्यावेळी कोणत्याही चित्रपटाने 100 कोटीहून अधिक कमाई करणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. या चित्रपटात अक्षय खन्ना देखील होता. या नंतर चित्रपटाचा दुसरा भाग आला. त्यालाही लोकांची पसंती मिळाली. दुसरा पार्ट साल 2013 रोजी आला. त्याने 180 कोटीची कमाई केली. त्यानंतर मेकर्सने तिसऱ्या भागात सैफ याच्या जागी सलमानना घेतले. साल 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाने 280 कोटीची कमाई केली. चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाने जादा कमाई केली नव्हती. तरी नफा मिळविण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. आता रेस-4 मध्ये सैफ अली खान याची पुन्हा होणारी एण्ट्री काय धमाल करते ? याकडे रसिकांचे लक्ष लागले आहे.