नागा-शोभिताच्या लग्न चालणार तब्बल ‘इतके’ तास; गेस्टची यादीही आहे खास

| Updated on: Dec 04, 2024 | 2:46 PM

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे आज म्हणजे 4 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. लग्नाचे विधी आणि  लग्नाला येणारे सर्व गेस्ट हे खास असल्याचे म्हटले जाते.

नागा-शोभिताच्या लग्न चालणार तब्बल इतके तास; गेस्टची यादीही आहे खास
Follow us on

अभिनेता नागा चैतन्य आज शोभिता धुलिपालासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या नात्याला आज नवीन ओळख मिळणार आहे. आज म्हणजेच 4 नोव्हेंबरला ते खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणारआहेत.

शोभिता नववधूचा कोणता पोशाख परिधान करणार आहे, गेस्ट कोणते असणार आहेत याचीय चर्चा आहे आणि सर्वांनाच उत्सुकताही आहे. लग्नात गेस्ट म्हणून फक्त खास पाहुणे आणि कुटुंबीयच सहभागी होणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या लग्नाला कोण कोण येणार आहे.

लग्न कुठे होणार?

प्रतिष्ठित अन्नपूर्णा स्टुडिओ येथे फॅमिली आणि खास मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत नागा चैतन्य आज शोभिता सात फेरे घेणार आहेत. पारंपारिक रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नाचे विधी पूर्ण करणार आहेत. हे विधी 8 तास चालणार असून तेलुगू ब्राह्मण परंपरेनुसार हे विधी असणार आहेत.

पुढे देखील अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. विशेष बाब म्हणजे अन्नपूर्णा स्टुडिओ हा नागा यांचे आजोबा आणि दिवंगत अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांचा आहे.

खास गेस्ट सोहळ्याला उपस्थित राहणार

शोभिता आणि नागा यांच्या लग्नाला फारसे पाहुणे येणार नसल्याचे म्हटले जाते. या दोघांनी फक्त काही खास लोकांनाच आमंत्रित केले आहे, ज्यात चिरंजीवी, राम चरण, महेश बाबू, उपासना, नम्रता, प्रभास, एसएस राजामौली, पीव्ही सिंधू, नयनतारा, अक्किनेनी कुटुंब आणि एनटीआरसह दग्गुबती या कुटुंबाचा समावेश आहे. ‘पुष्पा 2’ फेम अल्लू अर्जुनही आपल्या कुटुंबासह लग्नाला हजेरी लावणार आहे.

नागा आणि शोभिताची प्रेमकहाणी

नागा आणि शोभिता यांच्या प्रेमाबद्दल सांगायचे तर, समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोभिता नागाच्या आयुष्यात आली. दोघांची पहिली भेट 2022 मध्ये झाली होती. त्यादरम्यान दोघांची मैत्री झाली. शोभितानेही नागाचा वाढदिवस साजरा केला, तिथून त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. शोभितापूर्वी, नागा आणि समंथाचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही . लग्नानंतर 4 वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.