नताशा स्टॅनकोव्हिक आणि हार्दिक पंड्या गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत आहेत. अवघ्या चार वर्षांपूर्वी लग्नातच्या बंधनात अडकलेलं हे लोकप्रिय जोडपं आता विभक्त झालं असून 18 जुलै 2024 रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर नताशा ही मुलगा अगस्त्य याच्यासह, तिच्या मायदेशी सर्बियाला परत गेली. मात्र हार्दिकला सोडल्याबद्दल तिला ट्रोलिंगचाही बराच सामना करावा लागला. मात्र आता हार्दिक पंड्या पुन्हा चर्चेत आला असून जस्मिन वालिया या एका मॉडेलसोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आणि बाजी पलटली. नातं तुटण्यासाठी इतके दिवस जे लोक नताशाला दोष देत होते, त्यांनी आता लग्नाच्या अपयशाबद्दल हार्दिकला जबाबदार ठरवलं आहे.
हे नात तुटल्यानंतर नताशा मुलासह मायदेशी परतली असून तेथून अनेक पोस्ट्स शेअर करत असते. हार्दिक पांड्याला सोडल्यानंतर नताशाच्या आयुष्यात खास व्यक्ती असून त्याबद्दलचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
नताशाला कोणाचा सपोर्ट ?
एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, कोणती कठी परिस्थिती पार करू शकते. आणि त्याच मुलांमुळे तिला जगण्याची उमेदही मिळलते. हार्दिकपासून विभक्त तुटण्याचं दु:ख झेलणारी नताशा हिच्यासाठीही सध्या तिचा मुलगा अगस्त्य हा मोठा सपोर्ट आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये तिचा लाडका मुलगा पेपर टॉवेल घेऊन काचेचं टेबल पुसताना दिसत आहे. आईच्या कामात तो मदत करत होता. ‘माझा छोटा मतदनीस’ अशी कॅप्शनही नताशाने या व्हिडीओसोबत लिहीली आहे.
हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने पुन्हा सुरू केलं काम
एकीकडे हार्दिकचं मॉडेलशी अफेअर सुरू असल्याच्या चर्चा फिरत असताना, विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोव्हिक पुन्हा एकदा कामाला लागली आहे. तिने तिच्या कामावर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. 13 ऑगस्ट 2024 रोजी तिने तिच्या कामाशी संबंधित एक व्हिडीओ देखील इन्स्टाग्रावर शेअर केला होता. एका ब्रँडसाठी शूटिंग करणारी नताशा निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
हार्दिकला पुन्हा मिळालं प्रेम ?
एकीकडे नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत सायबेरियात नव्याने आयुष्य सुरू करत आहे. तर हार्दिक ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. क्रिकेटरच्या आयुष्यात नवीन प्रेम आले आहे, अशा अफवा पसरल्या आहेत. हार्दिक आणि
मॉडेल जस्मिन वालिया हे दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत.काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचे ग्रीसमधील फोटो व्हायरल झाले होते. मात्र त्यामध्ये ते दोघे एकत्र नव्हते. पण त्या फोटोंमधील सेम बॅकग्राऊंड पाहून नेटिझन्सनी असा अंदाज व्यक्त केला की ते दोघे एकाच ठिकाणी असून डेट एकमेकांना डेट करत आहेत.