एवढ्या कमी वयातही ती माझ्यापेक्षा… आराध्या बच्चननबाबत नव्या नंदा हिचं वक्तव्य; म्हणाली तिला सल्ला…

| Updated on: Apr 18, 2024 | 3:01 PM

श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या रायचं पटत नसल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. त्यातच आता श्वेताची लेक नव्या नंदा हिने तिची मामेबहीण, अर्था ऐश्वर्या- अभिषेकची लेक आराध्या बच्चन हिच्याबाबत केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

एवढ्या कमी वयातही ती माझ्यापेक्षा... आराध्या बच्चननबाबत नव्या नंदा हिचं वक्तव्य; म्हणाली तिला सल्ला...
Follow us on

संपूर्ण बच्चन कुटुंब सतत लाईमलाइटमध्ये असतं. अमिताभ बच्चन यांची मोठी नात नव्या नंदा मनोरंजन सृष्टीत नसली तरी ती तिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमुळे खूप चर्चेत असते. या शोमध्ये ती, तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी विविध विषयांवर गप्पा मारते. या शोमध्ये ऐश्वर्या राय बच्चन कधी दिसेल ? असा प्रश्न मध्यंतरी तिला विचारण्यात आला होता, तेव्हा तिने उत्तर देणं टाळलं होतं. मात्र आता नव्या मुलाखतीमध्ये नव्याने बच्चन कुटुंबातील आणखी एका व्यक्तीबद्दल वक्तव्य केलं असून त्यामुळे ती चर्चेत आली आहे. जेव्हा तिला तिची मामेबहीण आणि ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या बच्चनबद्दल परश्न विचारण्यात आला तेव्हा तिने असं उत्तर दिलं जे ऐकून चाहत्यांनाही आश्चर्य वाटलं.

एका वृत्तपत्राला नव्याने मुलाखत दिली. तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला की तुझ्या लहान बहिणीला, आराध्याला तू काय सल्ला देशील ? त्याचं उत्तर देताना नव्या म्हणाली की, आराध्या ही तिच्या वयात माझ्यापेक्षा अधिक समजूतदार आहे. मी त्या वयात जशी होते, त्यापेक्षा आराध्या खूप हुशार आहे. इतक्या लहान वयात, तिला गोष्टींची जाणीव आहे आणि ती खूप समजूतदार आहे, मला तिचं कौतुक वाटतं असंही नव्याने नमूद केलं.

 

मी तिला काय सल्ला देणार ?

सध्याची जनरेशन आमच्यापेक्षा खूप पुढे आहे. मी तिच्या वयाची होते तेव्हा इतकी समजूतदार नव्हते. आमच्या नंतरची ही पिढी खूप मजबूत आहे आणि त्यांना जग बदलण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी आराध्याला काय सल्ला देणार, मीच तिच्याकडून बरंच काही शिकत असते. इतक्या लहान वयात, तिला गोष्टींची जाणीव आहे आणि ती खूप समजूतदार आहे. गोष्टी शेअर करण्यासाठी घरात एक लहान बहीण असल्याचा मला आनंद आहे, असं नव्या म्हणाली.

 

नव्या नंदा अभिनयाच्या जगापासून दूर असली तर ती तिच्या व्यवसायातून खूप कमावते. याशिवाय ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तर अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चनची लाडकी लेक आराध्या बद्दल बोलायचं तर ती 13 वर्षांची आहे आणि सध्या शाळेत शिकत आहे. आराध्या अनेकदा तिची आई ऐश्वर्या रायसोबत फंक्शन्समध्ये दिसते.