मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
Mumbai | A team of Narcotics Control Bureau arrives at the residence of actor Ananya Pandey. A team of NCB is also present at Shah Rukh Khan’s residence
Visuals from Ananya Pandey’s residence pic.twitter.com/U5ssrIxpph
— ANI (@ANI) October 21, 2021
सर्च ऑपरेशनसाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी टीमचे अनेक फोटो समोर आले आहेत. एनसीबी टीम आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच्या फायलींसह शाहरुख खानच्या घरी पोहोचली आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे प्रख्यात अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. 2019 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटातूनही तिने अभिनय केला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील क्रूझमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खान 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. काल म्हणजेच बुधवारी आर्यन खानची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली. यानंतर, आज म्हणजेच गुरुवारी, आर्यन खानच्या वकिलांनी शाहरुखच्या मुलाच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आता 26 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शाहरुख आर्यनच्या भेटीला तुरुंगात
दरम्यान, अभिनेता शाहरुख खान मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र केवळ दहा मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली. आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यामुळे शाहरुखसह खान कुटुंबाला पुन्हा मोठा झटका बसला आहे. आर्यनचा तुरुंगातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढला आहे. मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत आहे.
तीन आठवड्यांनी दहा मिनिटांची भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानला लेकाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणं झालं. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसंच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणं टाळलं.
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामिनासाठी हायकोर्टात धाव, आता NCB ची पुढची पावलं काय?
VIDEO | आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात, बाप-लेकाची भेट किती मिनिटं?