नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अभिनेता अंगद बेदी (Angad Bedi) यांच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2018 मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र दोघांच्या अचानक लग्नाने लोकांना आश्चर्यचकित केले होते, कारण त्यांच्या लग्नाची चर्चा फक्त बी-टाऊनमध्ये होती. या बातमीनंतर, नेहाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा केल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाआधी प्रेग्नंट असल्याची गोष्ट अनेकांना पचनी पडली नाही आणि त्यांनी यासाठी अभिनेत्रीला ट्रोलही केले. लग्नाच्या 5 वर्षांनंतर नेहा धुपियाने खुलासा केला की, जेव्हा तिने तिच्या पालकांना लग्नापूर्वी तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती.
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया ही तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. आता दोन मुलांची आई असलेल्या नेहाने, आपण लग्नाआधीच आई बनणार असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल नुकताच खुलासा केला आहे. तिच्या पालकांनी तिला दिलेल्या 72 तासांचा किस्सा सांगितला.
लग्नाआधीच प्रेग्नंट होती नेहा धुपिया
नेहा धुपियाने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने 5 वर्षे जुने रहस्य उघड केले जे कोणालाच माहित नव्हते. नेहा धुपियाने लग्नाआधीच प्रेग्नंट असण्याबाबत खुलेपणाने सांगितले. ही बातमी कळल्यावर तिच्या पालकांनी काय प्रतिक्रिया दिली हेही तिने उघड केले.
72 तासांची गोष्ट
अभिनेत्रीने सांगितले की, ‘आम्ही कोणत्याही स्केलशिवाय लग्न केले होते. मी लग्नाआधी गरोदर होते, म्हणून जेव्हा आम्ही गेलो आणि माझ्या पालकांना कळवले. तेव्हा ते म्हणाले खूप छान आहे, पण (आता) तुझ्याकडे लग्नासाठी फक्त 72 तास आहेत. मला अडीच दिवसांचा अवधी देण्यात आला जेणेकरून मी मुंबईला जाऊन लग्न करू शकेन. मग आम्ही मुंबईत येऊन लग्न केले.
आईचं अंगदशी आहे खास नातं
आणखी एका मुलाखतीत, अभिनेत्रीने तिच्या आईच्या अंगद बेदीशी असलेल्या नात्याबद्दल सांगितले. माझी आई मनपिंदर उर्फ बबली धूपिया माझ्या आणि अंगदच्या नात्यामुळे खूश असल्याचे नेहा म्हणाली. अभिनेत्रीने खुलासा केला की ती इतर रिलेशनशिपमध्येही होती, पण तिची आई म्हणायची की अंगद खूप छान आहे, तू इतर लोकांना डेट का करत आहेस ? माझ्या घरात नेहमी अंगदच्या नावाचा जप चालायचा, दुसऱ्या कोणाचेही नाव यायचे नाही, असा खुलासा अभिनेत्रीने केला.