बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत… या आठवड्यात कोणते चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार?

| Updated on: Mar 21, 2025 | 3:52 PM

होळीनंतरच्या आठवड्यात थिएटरमध्ये नवीन आणि जुन्या चित्रपटांची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत तर, काही जुने चित्रपट देखील पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना नक्कीच नवीन आणि जुन्या चित्रपटांची गोडी चाखता येणार आहे.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत... या आठवड्यात कोणते चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार?
New & Re-released Movies list
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

होळीनंतर, पुन्हा एकदा नवीन आणि जुन्या चित्रपटांची धमाकेदार एन्ट्री आता सिनेमा चित्रपटगृहांमध्ये होणार आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत. या आठवड्यात अनेक नवीन चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज होणार आहेत. नवीन चित्रपटांसोबतच जुने चित्रपटसुद्धा या आठवड्यात रीरिलज होणार आहेत. चला जाणून घेऊयात या सर्वच चित्रपटांची यादी.

नवीन आणि जुने पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी 

पुन्हा प्रदर्शित होत असणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘घातक’, ‘लम्हे’, ‘यारियां’ आणि ‘द कराटे किड’ यांचा समावेश आहे. तर नवीन प्रदर्शित होणारे चित्रपट आहेत, ‘स्नो व्हाइट’, ‘लॉक्ड’आणि ‘पिंटू की पप्पी’. या चित्रपटांबद्दल काही थोडक्यात जाणून घेऊयात.

स्नो व्हाइट  : आता एका नवीन अवतारात प्रेक्षकांसमोर येत आहे. यावेळी हा चित्रपट लाईव्ह-अ‍ॅक्शनमध्ये असणार आहे आणि राहेल झेगलर स्नो व्हाइटच्या भूमिकेत दिसणार आहे, तर प्रसिद्ध अभिनेत्री गॅल गॅडोट यावेळी खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेत थोडासा ट्विस्ट देखील पाहायला मिळणार आहे. येथे स्नो व्हाइट केवळ एक नाजूक राजकुमारी राहणार नाही, तर ती स्वतःचे नशीब लिहिण्यासाठी संघर्ष करताना दिसते. हा चित्रपट 20 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून. तुम्ही हा चित्रपटाचा पाहायला नक्कीच जाऊ शकता.

लॉक्ड : हा चित्रपट पाहताना थ्रिल नक्कीच जाणवते. या आठवड्यात हॉलिवूडमध्ये आणखी एक मोठा चित्रपट प्रदर्शित होत आहे तो म्हणजे ‘लॉक्ड’, ज्यामध्ये अँथनी हॉपकिन्स आणि बिल स्कार्सगार्ड मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रसिद्ध अर्जेंटिनाच्या ‘4X4’ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका चोराची आहे जो काहीतरी चोरण्यासाठी एका आलिशान कारमध्ये प्रवेश करतो, परंतु ही कार प्रत्यक्षात एक प्राणघातक सापळा ठरते. गाडीचा मालक एक विचित्र माणूस असतो जो त्याच्या स्वतःच्या विचित्र न्याय पद्धतीने चोराला शिक्षा करू इच्छितो. हा चित्रपट साहस, थरार आणि ट्विस्टने भरलेला आहे जो प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवेल.हा चित्रपट आज म्हणजे 21 मार्चला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहायला जाऊ शकता.

पिंटू की पपी : एक अनोखी प्रेमकथा
या आठवड्यात बॉलिवूडमध्ये ‘पिंटू की पप्पी’ हा एक मजेदार विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामध्ये सुशांत, जानिया जोशी आणि विदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची कथा पिंटू नावाच्या एका मुलाभोवती फिरते, ज्याचे नशीब खूप विचित्र दाखवण्यात आले आहेत. तो त्याच्या ज्या ज्या गर्लफ्रेंडला किस करतो तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होते. हा चित्रपट शिव हरे यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात मुरली शर्मा आणि विजय राज सारखे अनुभवी कलाकार देखील आहेत. हा चित्रपट आज म्हणजे 21 मार्चला सिनेमागृहात रिलीज झाला आहे. तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहायला जाऊ शकता.