मुंबई : ऑनलाईन मुव्ही तिकिटची बुकिंग सर्व्हिस देणाऱ्या ‘बुक माय शो’ ने प्रेक्षकांसाठी एक नवी सर्विस उपलब्ध केली आहे. बुक माय शो वर आता ‘बुक माय शो स्ट्रीम’ ही सर्व्हिस प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाली आहे. या सर्व्हिसला ट्रान्जेक्शनल व्हिडिओ ऑन डिमांड (TVOD) नाव देण्यात आले आहे. युजर्स आता बुक माय शो च्या अॅपवर ऑन-डिमांड मुव्हिज पाहू शकतात. या सर्व्हिसमध्ये युजर्सला चित्रपट खरेदी आणि भाड्याने घेण्याचा पर्याय असेल. प्रत्येक चित्रपटाचा खरेदी आणि भाडे दर वेगवेगळा असेल.(new demand service of book my show for users)
कोरोनामुळे जे लोक चित्रपटगृहात जाण्यास टाळत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा लाभदायी ठरणार आहे. सुरुवातीलाच 72 हजार तासांहून अधिक कंटेन्ट आणि 600 हून अधिक चित्रपट या सर्व्हिसमध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त दर शुक्रवारी युजर्ससाठी प्रीमियम कंटेन्ट देण्यात येईल. बुक माय शो चे स्ट्रिम सबस्क्रिप्शन्स बेस्ड मॉडेल नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या प्लॅटफॉर्महून खूपच वेगळे आहे. युजर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कंटेन्ट ऑनलाईनच भाड्याने किंवा खरेदी करु शकतो.
बुक माय शो वर नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओ प्रमाणे अनेक भाषांमध्ये चित्रपट उपलब्ध आहेत. सध्या ‘बुक माय शो स्ट्रीम’वर उपलब्ध चित्रपटांच्या यादीत क्रिस्टोफर नोलनचा ‘टेनट’ या वार्नर ब्रदर्सचा ‘वंडर वुमन 1984’, द गिल्टी, पोर्ट्रेट ऑफ ए लेडी ऑन फायर, आंखों देखी, आराधना (1969) आदी ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.
तुम्हाला bookmyshow चे अॅप डाऊनलोड करा किंवा ब्राऊझरमध्ये bookmyshow ची वेबसाईट ओपन करा.
आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक किंवा जीमेल, फेसबुकच्या मदतीने साईन इन करु शकता.
मुव्ही कॅटेगरीमध्ये जाऊन जी मुव्ही एक्सेस करायची आहे त्याच्यावर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हा बाय किंवा रेंटचा पर्याय निवडावा लागेल.
आता कोणताही एक पर्याय निवडा आणि पुढे जा.
तुमचा फोन नंबर आणि ई-मेलची डिटेल विचारली जाईल.
यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल.
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बुक माय शो वर सेलेक्ट केलेला चित्रपट पाहू शकता.(new demand service of book my show for users)
बहुप्रतीक्षित MG ZS EV 2021 फेसलिफ्ट भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 400 किमी धावणार#MGZSEV #MGZSEV2021 #ElectricVehicle https://t.co/V6DrMf9oiY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
इतर बातम्या
शेतकरी आंदोलनावरून प्रियांकाला टोला आता मियाच होतीये ट्रोल, वाचा काय झाल!
कपिल शर्मा शो बंद होताच स्टार प्लसचा ‘कॉमेडी अड्डा’, रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्गजांची मांदियाळी
(new demand service of book my show for users)