Shahrukh Khan | आधी छैंया छैंया आता शाहरूख करतोय ता ता थैया… ‘जवान’चं नवं गाणं झालं रिलीज!

| Updated on: Aug 29, 2023 | 4:15 PM

Jawan Song Ramaiya Vastavaiya : शाहरूख खान याचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यात शाहरूख आणि नयनतारा हे दोघेही दमदार डान्स करत धमाल करताना दिसत आहेत. त्याच्या या गाण्याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Shahrukh Khan | आधी छैंया छैंया आता शाहरूख करतोय ता ता थैया... जवानचं नवं गाणं झालं रिलीज!
Follow us on

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान ( Shahrukh Khan) हा सध्या त्याच्या ‘जवान‘ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मीडिया आणि इव्हेंट्स द्वारे प्रमोशन न करताही सोशल मीडियावर शाहरूख खान आणि त्याचा जवान (Jawan movie)  चित्रपट बराच चर्चेत आहे. जवानचं दुसरं गाणं ‘नॉट रमैया वस्तावैया’ रिलीज करण्यात आले असून ते फुल धमाल, पार्टी साँग आहे. या गाण्यातील शाहरूखची एनर्जी पाहून तरूण कलाकारही तोंडात बोटं घालतील. ‘नॉट रमैया वस्तावैया’ या गाण्यात शाहरूख फुल मस्ती करत नाचताना दिसत आहे.

धमाकेदार एनर्जी असलेलं हे गाण चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. या गाण्यात शाहरूख एकदम पार्टी मोड मध्ये असून सुंदर तरूणींसोबत नाचतान दिसत आहे. या गाण्याला अनिरुद्ध याने संगीत दिले असून कुमार याने गाण्याचे शब्द लिहीले आहेत. जवानचं हे नवं गाण लवकरच लोकप्रिय होण्याच्या मार्गावर आहे. हे गाणं शेअर करताना शाहरूखने लिहीलं आहे, ‘ना छैय्या छैय्या…दिस इज नॉट रमैया वस्तावैया…ये है जवान का ता…ता..थैय्या-थैय्या रे’. त्यासोबतचं शाहरूख खान याने विशाल ददलानी आणि शिल्पा अरोरा यांचेही आभार मानले आहेत.

 

‘जवान’ची दोन गाणी झाली  आहेत रिलीज

यापूर्वी जवान चित्रपटातील दोन गाणी रिलीज झाली असून एनर्जीने भरपूर असे ‘जिदा बंदा’ गाणं चाहत्यांना खूपच आवडलं आहे. तर ‘चलेया’ गाण्यामध्ये शाहरूख खान आणि नयनतारा यांची रोमँटिक केमिस्ट्री देखील फॅन्सना आवडली आहे. आता नवं आलेल्या ‘नॉट रमैया वस्तावैया’या गाण्यावरही फॅन्स लवकरच थिरकू लागतील हे नक्की.

7 सप्टेंबरला रिलीज होणार ‘जवान’

‘पठाण’च्या भव्य यशानंतर शाहरूखच्या ‘जवान’ या आगामी चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात साऊथचेही बरेच कलाकार आहे. नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पडूकोणस सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर हे देखील या चित्रपटात झळकणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी,तामिळ आणि तेलगु भाषेतही प्रदर्शित होईल.