मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारलं असून तिला शिर्केपाटलांच्या सुनेचे सर्व अधिकारसुद्धा दिले आहेत. त्यामुळे आता शिर्केपाटील कुटुंबावरचं तिरस्काराचं सावट दूर झालंय. एकीकडे माईंनी गौरीला सून म्हणून स्वीकारलं आहे तर दुसरीकडे जयदीप आणि गौरीचं नातंही बहरू लागलं आहे. लवकरच जयदीप गौरीला कार चालवायला देखील शिकवणार आहे.
मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना गौरीची भूमिका साकारणारी गिरीजा प्रभू म्हणाली, ‘जयदीप-गौरी या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. जयदीप-गौरीचं नातंही दिवसेंदिवस बरहतंय. लवकरच मालिकेत एक छान ट्रॅक पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये जयदीप गौरीला कार चालवायला शिकवतो. खरं सांगायचं तर मला ड्रायव्हिंग अजिबाज जमत नाही. हा सीन करताना मला जयदीप म्हणजेज मंदार जाधवनं कार शिकवली आहे. सुरुवातीला खूपच भीती वाटत होती. मात्र मंदारचं मार्गदर्शन आणि संपूर्ण टीमच्या पाठिंब्यामुळे मी हा सीन करु शकले.’
गौरी आणि जयदीपच्या नात्यातले हे नवे क्षण अनुभवण्यासाठी पाहात राहा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’.
तर स्टार प्रवाहवरच सुरु असलेल्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी जीजी अक्कांनी फक्त 15 दिवसांची मुदत दिली होती. पंधरा दिवसांचा हा अवधी आता संपत आला आहे. या पंधरा दिवसात कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे. कीर्तीच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठी आता मालिकेत काकीसाहेबांची एंट्री होणार आहे.
संबंधित बातम्या
Vidarbha Ratna : सिनेसृष्टीत मराठीतील पहिला रॅपर, श्रेयश जाधव ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने सन्मानित