मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Krte) मालिकेत आता नवं वळण येणर आहे. अरुंधतीसमोर (Arundhati) आता आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. एकीकडे इशाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी मदत करत असतानाच दुसरीकडे अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे. (new twist to the serial ‘Aai Kuthe kay krte,’ Arundhati will face another crisis)
अभिषेकने रुग्णांची सेवा करत बजावलं आपलं कर्तव्य
डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखील केली आहे.
अभिषेकवरचा हा आरोप खरा की खोटा
अभिषेकवरचा हा आरोप खरा आहे का? त्याची या आरोपातून कशी सुटका होणार? मुलांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणारी अरुंधती अभिषेकला यातून कसं सावरणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.
अरुंधतीची खरी कसोटी
‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात घडणारा हा प्रसंग. कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते. प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते. आपलंस वाटणारं कथानक आणि आपलीशी वाटणारी पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालिकेचा यापुढील प्रवास तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे.
संबंधित बातम्या