सोनाक्षीचं लग्न होताच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत बिघडली?, नेमकं काय झालं?; तब्येत कशी ?

| Updated on: Jun 29, 2024 | 10:42 AM

प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला सहा दिवसही होत नाही तोच शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत बिघडल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सोनाक्षीचं लग्न होताच अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची तब्येत बिघडली?, नेमकं काय झालं?; तब्येत कशी ?
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा बॉयफ्रेंड जहीर इकबाल हे दोघेही विवाह बंधनात अडकले. या दोघांनाही बॉलिवूडसह राजकारणातील बड्या हस्तींनी शुभेच्छा दिल्या. मधल्या काळात या आंतरधर्मीय लग्नामुळे प्रतिक्रियाही उमटल्या. पण सर्व विघ्न पार पाडत अखेर दोघांनीही संसार थाटला. त्यानंतर जहीर आणि सोनाक्षी हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाले. त्यामुळे सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, या केवळ अफवा असल्याचं दिसून आलं आहे. कारण प्रकरण काही वेगळंच आहे. सोनाक्षीचे वडील आणि प्रसिद्ध लिजेंडरी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना अॅडमिट करण्यात आलं. वडिलांना पाहण्यासाठीच सोनाक्षी नवऱ्यासोबत रुग्णालयात आल्याचं आता उघड झालं आहे.

अभिनेता शत्रुघ्न सिन्हाची तब्येत ठिक आहे. ते केवळ रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात आले होते, असं सांगण्यात येत आहे. शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नावर खूश नसल्याचं सांगितलं जात होतं. ते मुलीच्या लग्नाला येणार नसल्याचीही चर्चा होती. पण या केवळ अफवा ठरल्या. शत्रुघ्न सिन्हा पूर्ण कुटुंबासह आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाला उपस्थित होते. यावेळी ते प्रचंड आनंदी होते. पण लग्नाच्या धावपळीमुळे त्यांना थकवा आला. अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात यावं लागलं. दगदग सहन न झाल्याने ते रुग्णालयात भरती झाले. त्यामुळे सोनाक्षी वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आली. पण तिच्याच प्रेग्नंसीच्या वावड्या उठवल्या गेल्या.

 

दणक्यात लग्न

सोनाक्षीने 23 जून रोजी रजिस्टर्ड मॅरेज केलं. त्यानंतर संध्याकाळी ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेता सलमान खान तर टाइट सेक्युरिटीसह लग्नाला उपस्थित राहिला. यावेळी हनी सिंगचाही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानेही या आपल्या मित्रांच्या लग्नात प्रचंड धमाल केली. लग्नाच्यावेळी सोनाक्षीने तिच्या आईची 40 वर्ष जुनी साडी परिधान केली होती. सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा यांनी लग्नात ही साडी नेसली होती.

नवा सिनेमा येतोय

दरम्यान, 12 जुलै रोजी सोनाक्षीचा ककुडा प्रदर्शित होणार आहे. सोनाक्षीच्या या सिनेमाचा सामना अभिनेते कमल हसन यांच्या इंडिय-2 सोबत होणार आहे. त्यामुळे सोनाक्षीच्या या सिनेमाला प्रेषक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.