मुंबई : ‘बिग बॉस 14’ फेम अभिनेत्री निक्की तंबोली (Nikki Tamboli) हिचा भाऊ जतीन तंबोली (jatin Tamboli) याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. निक्कीचा भाऊ बराच काळ कोरोना आणि इतर आजारांविरुद्ध लढाई लढत होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन निक्कीने याबाबत माहिती दिली आहे. तिने भावाचा फोटो शेअर केला आहे आणि भावनिक पोस्टही शेअर केली आहे (Nikki Tamboli Brother Jatin Tamboli died due to corona).
आपल्या भावाचा फोटो शेअर करताना निक्कीने लिहिले की, ‘आम्हाला माहित नव्हते की आज सकाळी देव तुमच्या नावाने आवाज देत होता. आमचे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि तू गेल्यानंतरही आम्ही तुझ्यावर तेवढेच प्रेम करू. तुला गमावल्यानंतर आमचे हृदय तुटले आहे. तू एकटा गेला नाहीस, जाताना आमच्यातील एक महत्त्वाचा भाग घेऊन गेलास.’
‘बिग बॉस 14’ची सेकंड रनरअप निकी तंबोली (Nikki Tamboli) अलीकडेच कोरोनामधून सावरली आहे. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाला बळी पडली होती, परंतु आता कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्रीने इतरांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे. निक्कीने आता गरजू लोकांना प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर थेट लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांना आपली मनीषा सांगितली. निक्कीने चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे (Nikki Tamboli Brother Jatin Tamboli died due to corona).
निक्की म्हणाली, ‘कोरोना मुक्त झाल्यावर आता मी सरकारी रुग्णालयात प्लाझ्मा दान करणार आहे. ज्यांना याची गरज आहे आणि ज्यांना ते परवडत नाही, त्यांना हा प्लाझ्मा मिळू शकेल. मी सर्वांना सांगू इच्छिते की, आपण सर्वजण स्वत:ची काळजी घ्या, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माझा भाऊ देखील रुग्णालयात दाखल आहे. सध्या गोष्टी खूप वाईट आहेत. जेव्हा जेव्हा माझे पालक मला कॉल करतात, तेव्हा मला भीती वाटते की, आता काय होईल, हे मला माहित नाही. मला आशा आहे की, कोरोनाशी आपले युद्ध लवकरच संपेल आणि प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.’
अलीकडेच अशी बातमी आली आहे की, निक्की रोहित शेट्टीच्या शो ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये निक्की स्टंट करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये निक्कीला खूप पसंती मिळाली होती, म्हणून आता अभिनेत्रीच्या चाहत्यांना आशा आहे की ती या शोमध्येही तिची कमाल दाखवेल. यावेळी या कार्यक्रमाचे शूट केप टाऊनमध्ये होणार आहे. 6 मे रोजी सर्वजण केपटाऊनमध्ये जातील आणि तेथे 1 महिना तिथेच थांबतील.
(Nikki Tamboli Brother Jatin Tamboli died due to corona)
Photo Prem : ‘फोटो प्रेम’ करणार प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन; नीना कुलकर्णी मुख्य भूमिकेत
Video | पाठक बाई रमल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या आठवणीत, अक्षयाने शेअर केला ‘Nostalgia’ व्हिडीओ