कोरोनामुक्त झालेल्या निक्की तंबोलीचा मोठा निर्णय, कोरोना रूग्णांसाठी करणार ‘अशी’ मदत!

| Updated on: Apr 27, 2021 | 4:03 PM

‘बिग बॉस 14’ची सेकंड रनरअप निकी तंबोली (Nikki Tamboli) अलीकडेच कोरोनामधून सावरली आहे. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाला बळी पडली होती, परंतु आता कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्रीने इतरांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे.

कोरोनामुक्त झालेल्या निक्की तंबोलीचा मोठा निर्णय, कोरोना रूग्णांसाठी करणार ‘अशी’ मदत!
निक्की तंबोली
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 14’ची सेकंड रनरअप निकी तंबोली (Nikki Tamboli) अलीकडेच कोरोनामधून सावरली आहे. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाला बळी पडली होती, परंतु आता कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्रीने इतरांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे. निक्कीने आता गरजू लोकांना प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर थेट लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांना आपली मनीषा सांगितली. निक्कीने चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे (Nikki tamboli takes decision to donate plasma for Corona Patients).

निक्की म्हणाली, ‘कोरोना मुक्त झाल्यावर आता मी सरकारी रुग्णालयात प्लाझ्मा दान करणार आहे. ज्यांना याची गरज आहे आणि ज्यांना ते परवडत नाही, त्यांना हा प्लाझ्मा मिळू शकेल. मी सर्वांना सांगू इच्छिते की, आपण सर्वजण स्वत:ची काळजी घ्या, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माझा भाऊ देखील रुग्णालयात दाखल आहे. सध्या गोष्टी खूप वाईट आहेत. जेव्हा जेव्हा माझे पालक मला कॉल करतात, तेव्हा मला भीती वाटते की, आता काय होईल, हे मला माहित नाही. मला आशा आहे की, कोरोनाशी आपले युद्ध लवकरच संपेल आणि प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.

‘कांचना 3’ अभिनेत्री निक्कीच्या आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, परंतु अभिनेत्रीला आपल्या कामाची बांधिलकी पूर्ण करायची असल्याने तिने आपले काम सुरू ठेवले.

‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार

अलीकडेच अशी बातमी आली आहे की, निक्की रोहित शेट्टीच्या शो ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये निक्की स्टंट करताना दिसणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये निक्कीला खूप पसंती मिळाली होती, म्हणून आता अभिनेत्रीच्या चाहत्यांना आशा आहे की ती या शोमध्येही तिची कमाल दाखवेल. यावेळी या कार्यक्रमाचे शूट केप टाऊनमध्ये होणार आहे. 6 मे रोजी सर्वजण केपटाऊनमध्ये जातील आणि तेथे 1 महिना तिथेच थांबतील (Nikki tamboli takes decision to donate plasma for Corona Patients).

नवीन घरात शिफ्ट झाली

बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतर निक्की तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या नवीन घराची झलक दाखविली. गेल्या काही दिवसांपासून निक्कीचे नाव नेहा कक्करचा भाऊ टोनीशी जोडले जात आहे. असं म्हटलं जात आहे की, दोघे एकमेकांना डेट करत आहेत, पण या वृत्तावर दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली नाही.

(Nikki tamboli takes decision to donate plasma for Corona Patients)

हेही वाचा :

PHOTO | ‘शेवंता’ रंगलीय नव्या ‘छंदात’, पाहा अपूर्वा नेमळेकर सध्या काय करतेय…

‘द कपिल शर्मा शो’ची ‘ही’ प्रसिद्ध जोडी अडकली विवाह बंधनात, चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव!