Tv9 मराठी Exclusive | कोर्टाने विनंती फेटाळल्यानंतर त्याच रात्री नितीन देसाई यांचा ‘तो’ टोकाचा निर्णय

| Updated on: Aug 03, 2023 | 11:53 PM

नितीन देसाई यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती आता समोर येत आहेत. देसाई यांनी ज्या रात्री टोकाचा निर्णय घेतल्या त्या रात्री ते दिल्लीहून आले होते. ते रात्री 12 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर रात्री दोन वाजेच्या सुमारास कर्जतला एनडी स्टुडिओला पोहोचले होते.

Tv9 मराठी Exclusive | कोर्टाने विनंती फेटाळल्यानंतर त्याच रात्री नितीन देसाई यांचा तो टोकाचा निर्णय
Follow us on

मुंबई | 3 जुलै 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या एनडी स्टुडिओत आयुष्यातील सर्वात टोकाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय खूप धक्कादायक आहे. त्यांच्या या निर्णायमुळे कलाविश्वासह राजकीय विश्वातील अनेकांना धक्का देणारा आहे. विशेष म्हणजे राज्यातील प्रेक्षक आणि सर्वसामान्य जनता देखील या घटनेमुळे हळहळली आहे. देसाई यांचासारखा कलाकार तयार व्हायला एक मोठी तपश्चर्य लागते. त्यांच्या तपातून नव्या पिढीला नवी उमेद मिळत होती. याशिवाय अनेक गोष्टी अजून घडायच्या होत्या. असं असताना त्यांनी स्वत:ला संपवून खूप चुकीचं पाऊल उचललं.

नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देसाई यांनी कोर्टात एक विनंती केली होती. त्यांची ती विनंती स्वीकार न झाल्यानंतर त्यांनी त्याच रात्री हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आता समोर येत आहे. नितीन देसाई 1 ऑगस्टला दिल्लीत गेले होते. तिथे दिल्लीतील NCLT कोर्टाच्या प्रिन्सिपल बेंचसमोर त्यांनी अपील केलं होतं.

मुंबई NCLT कोर्टाने पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही दाद मागण्यात आली होती. मात्र दिल्ली NCLT कोर्टाने मुंबई कोर्टाचा निर्णय वैध ठरवत नितीन देसाई यांची अपील याचिका फेटाळली होती. कोर्टाने 1 ऑगस्टला ही याचिका फेटाळल्यानंतर नीतीन देसाई रात्री उशिरा मुंबईत परतले आणि त्यांनी ND स्टुडिओत स्वत:ला संपवलं.

कर्जाचं नेमकं प्रकरण काय ?

नितीन देसाई यांनी एका वित्तीय संस्थेकडून 180 कोटींच कर्ज घेतलं होतं, जे आता व्याजासहित 250 कोटी झालंय. या कर्जाच्या वसुलीसाठी एडलवाईज कंपनी सातत्याने प्रयत्न करत होती. कर्जाची वसुली करण्यासाठी एडलवाईज कंपनीने NCLT कोर्टात धाव घेतली. तसेच रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडेही एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात कर्ज घेताना नितीन देसाई यांनी तारण ठेवलेली एनडी स्टुडिओची जमीन ताब्यात द्यावी आणि कर्जवसुली केली जावी, असा प्रस्ताव होता.

नितीन देसाई यांनी जवळपास 42 एकर जमीन कर्ज घेताना गहाण ठेवली होती. याच कर्जाच्याया वसुलीसाठी एडलवाईज कंपनी मानसिक त्रास देत असून आपली फसवणूक झाल्याची भावना नितीन देसाई यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये मांडलीय. याचसंदर्भात NCTL कोर्टात एडलवाईज कंपनीने केलेल्या याचिकेवर 25 जुलैला निकाल आला, ज्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई केली जावी, असे निर्देश देण्यात आले.

एडलवाईज आणि एनडी स्टुडिओ यांच्यातला हा कर्जाचा तिढा सोडवण्यासाठी जितेंद्र कोठारी या अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आली. त्यामुळेच नितीन देसाई चिंतेत होते. याच मुंबई NCLT कोर्टाच्या निकालाविरोधात त्यांनी दिल्ली NCLT कोर्टाच्या प्रिन्सिपल बेंचकडे अपिल करून दाद मागितली. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळेच खच्चीकरण झाल्यानेच त्यांनी मुंबईत येताच आत्महत्या केली का? अशी चर्चा आता सुरू आहे.