दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमधील एक नामवंत दिग्दर्शक मानले जातात. एकाहून एक सरस चित्रपट देणाख्या भन्साळी हे हीरामंडी- द डायमंड बाजार (Heeramandi) द्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यु करत आहेत. यापूर्वी त्यांनी खामोशी, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक यासह अनेक एकाहून एक सरस चित्रपट दिग्दर्शित केलेत. मात्र ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने संजय लीला भन्साळी यांचं करिअर एका नव्या उंचीवर पोहोचवलं. या चित्रपटात सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटातील ऐश्वर्याच्या कामाचं बरंच कौतुकही झालं. पण या भूमिकेसाठी ऐश्वर्या ही पहिली पसंती नव्हती, तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचीला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते, हे तुम्हाला माहीत आहे का ?
मनिषा होती निर्मात्यांची निवड
हो, हे खरं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला हिला अप्रोच करण्यात आलं होतं. 28 वर्षांपूर्वी मनीषा कोईराला हिने संजय लीली भन्साळीसोबत खामोशी चित्रपटात काम केलं होतं. त्यामध्ये सलमान खान याचीही प्रमुख भूमिका होती. आता मनिषा ‘हीरामंडी’द्वारे पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करत आहे. याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये मनिषाने हम दिल दे चुके सनम बद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मनिषा म्हणाली – ‘ खामोशी (चित्रपट) नंतर माझं आणि संजय यांचं बाँडिंग चांगलं खूप चांगलं होतं, ते आत्तापर्यंत तसंच (कायम) आहे. त्यामुळे जेव्हा ते हम दिल दे चुके सनम दिग्दर्शित करणार होते, तेव्हा आमचं बोलणं झालं. मी तेव्हा नेपाळमध्ये आनंदात आयुष्य जगत होते आणि तेव्हाच मला या चित्रपटाची ऑफर मिळाली. पण दुर्दैवाने मी या चित्रपटाचा एक भाग बनू शकले नाही. एवढंच नव्हे तर शाहरुखची भूमिका असलेल्या देवदास चित्रपटातील भूमिकेसाठीही मला विचारणा करण्यात आली होती’ असं मनिषाने नमूद केलं.
हीरामंडीमधून मनिषाचं ओटीटीवर पदार्पण
हीरामंडी या वेब सीरिजमधून मनिषा कोईराला बऱ्याच काळानंतर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये मनिषाची अत्यंत प्रमुख आणि दमदार भूमिका आहे. ओटीटीवर ही वेबसीरिज नुकतीच रीलिज झाली.