तर ‘जब वी मेट’ मध्ये करीना ऐवजी दिसली असती ही हिरॉईन

| Updated on: Apr 26, 2023 | 1:46 PM

'जब वी मेट' या चित्रपटातील गीतची भूमिका इतकी प्रसिद्ध झाली आहे की अनेक तरूणी तिच्यात स्वत:ला बघतात. करीना ही करीना न वाटता संपूर्णपणे गीतच वाटते, इतके तिने झोकून काम केले आहे. पण या भूमिकेसाठी करीनाच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्रीची निवड झाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का ?

तर जब वी मेट मध्ये करीना ऐवजी दिसली असती ही हिरॉईन
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : ‘मैं अपनी फेव्हरिट हूं’ ‘ आप कन्विन्स हो गये है, या मै और बोलू? ‘ ‘ प्यार मे कुछ सही गलत नही होता’, हे आणि असे असंख्य डायलॉग बोलत तूफानमेल सारखी बडबड-बडबड करणारी गीत तुम्हाला आठवते का ? हो, तीच ती जब वी मेट (Jab we met)वाली गीत… करीनाने (Kareena Kapoor) तिच्या दिलखुलास अभिनयाने गीतची भूमिका अशी रंगवली की प्रत्येक तरूणीला गीतमध्ये त्या स्वत:च दिसत असतं. सर्वांनाच करीनाचे हे काम खूप आवडले आणि त्यासाठी तिचे खूप कौतुकही झाले. पण या भूमिकेसाठी करीनाच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्रीची (another actress) निवड झाली होती, हे तुम्हाला माहीत आहे का ?

हो, हे खरं आहे. गीतच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री भूमिका चावलाची निवड करण्यात आली होती. खुद्द भूमिकानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हा भूमिकाचा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून त्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. ‘तेरे नाम’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. मात्र त्यानंतर काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर ती गायबच झाली. आता पुन्हा ‘किसी का भाई किसी की जान’ द्वारे ती हिंदीत दिसली आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या मुलाखतीदरम्यान, भूमिकाने अनेक चित्रपटांमध्ये रिप्लेस झाल्याबद्दलही चर्चा केली. तिला ‘जब वी मेट’ आणि ‘मुन्ना भाई एमबीबीएस’सह अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकांची ऑफर देण्यात आली होती, असा खुलासा भूमिकाने केला. मात्र, शेवटी काही कारणाने तिच्या हातातून ते चित्रपट निसटले आणि तिच्याऐवजी काळात काही कारणास्तव करीना कपूर आणि ग्रेसी सिंग यांना या चित्रपटांमध्ये घेण्यात आले.

‘तेरे नाम’च्या लोकप्रियतेचाही भूमिकाला फायदा झाला नाही

भूमिकाने ‘तेरे नाम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये सतीश कौशिक दिग्दर्शित हा हिट चित्रपट बाला आणि जैनेंद्र जैन यांनी लिहिला होता. मात्र, ‘तेरे नाम’ची लोकप्रियता असूनही भूमिकासाठी चित्रपट मिळणे सोपे नव्हते.

अनेक चित्रपटांमध्ये करण्यात आले रिप्लेस

“(तेरे नाम नंतर). मला अनेक प्रस्ताव आले. मी माझ्या कामाबद्दल नेहमीच क्रिएटिव्ह आणि चूझी असते. नंतर मी एक मोठा चित्रपट साईन केला होता पण दुर्दैवाने निर्मिती बदलली, नंतर नायक बदलला, चित्रपटाचे शीर्षक बदलले. मग नायिकाही बदलली. पण मी हे केले असते तर वेगळे झाले असते, म्हणून तर म्हणतात, जे (भविष्यात) लिहिले असते, तेच घडते ते घडते. (जो लिखा है वो होता है.) , असे भूमिका म्हणाली.

मी वर्षभर त्या चित्रपटाची वाट पाहिली आणि दुसरा कोणताही चित्रपट साइन केला नाही. नंतर मी दुसरा चित्रपट साइन केला, तोही झाला नाही. बाकी जे केले होते ते थोडे चालले आणि काही चालले नाहीत. हे तर जुगार खेळण्यासारखे आहे, कधी आणि कोणता चित्रपट चालेल हे कळत नाही.

‘जब वी मेट’मधून काढून टाकल्यावर वाईट वाटलं.

भूमिका पुढे म्हणाली, “जब वी मेटसाठी साइन केले आणि नंतर तसे झाले नाही, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आधी त्या चित्रपटाचं नाव ‘ट्रेन’ ठरलं होतं, त्यात मी होते, बॉबी (देओल) होता, नंतर मग शाहिद (कपूर) आला. तेव्हा मी व शाहिद मुख्य भूमिकेत होतो. नंतर माझ्याऐवजी आएशा (टाकिया) आली .. पण सर्वात शेवटी त्या चित्रपटात करीना (कपूर) आणि शाहिद राहिले. बऱ्याच गोष्टी घडल्या, पण ते ठीक आहे,’ असेही भूमिकाने नमूद केले.

रिप्लेस झाल्याबाबत भूमिका जास्त विचार करत नाही

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला फक्त एकदाच वाईट वाटले आणि पुन्हा कधीच वाटले नाही कारण मी फक्त पुढे गेले. मी याबद्दल जास्त विचार करत नाही. मी मुन्ना भाई एमबीबीएसही साइन केले होते पण तसे झाले नाही. मणि (रत्नम) सरांसोबतही चित्रपट साईन केला, तोही झाला नाही. ‘