मुंबई : सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीत (South Film Industry) आत्ता जसे चित्रपट बनत आहेत, त्या चित्रपटांनी सध्या बॉलिवूडलाही (Bollywood) धडकी भरवली आहे. मात्र ही इंडस्ट्री आज या लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दिग्गज अभिनेत्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अशाच एका दिग्गज अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. एन टी रामा राव (NT Rama Rao) हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत माहित नसणारा व्यक्ती कदाचितच सापडेल. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक आणि राजकारणी ज्यांनी तीन टर्ममध्ये सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. एन.टी. रामाराव हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. ते त्यांच्या NTR टोपणनावाने प्रसिद्ध आहेत, त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ते त्यांच्या देवांच्या भूमिकांसाठी खास लोकप्रिय राहिले, त्यांनी काम केलेल्या बहुतेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि काही चित्रपटांची पटकथा देखील लिहिली आहे.
चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कारकीर्दीनंतर यांनी नंतर स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. नंदामुरी तारका रामाराव यांचा जन्म 28 मे 1923 रोजी ब्रिटीश काळातील मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या कृष्णा जिल्ह्यातील निम्माकुरू या छोट्या जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या काकांना अपत्य नसल्याने त्यांना दत्तक देण्यात आले. ते त्यांच्यासोबतच राहिले, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि सब-रजिस्ट्रार म्हणून नोकरीला रुजू झाले, मात्र ही नोकरी तीन आठवड्यांच्या आत सोडली आणि स्वतःला अभिनयात उतरवले.
मन देशम (1949) या चित्रपटातील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका ही त्यांची पहिली चित्रपटातील भूमिका होती, त्यानंतर त्यांनी 1950 च्या दशकात हिंदू देव, कृष्णाच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवण्यापूर्वी काही छोट्या भूमिकांमध्ये काम केले. श्रीकृष्णार्जुन युद्धम (1962), आणि दाना वीरा सूरा कर्ण (1977) सारख्या चित्रपटांसह एकूण 17 चित्रपटांमध्ये एनटीआर यांनी कृष्णाची भूमिका केली होती. भगवान कृष्णाव्यतिरिक्त, एनटीआर यांनी धार्मिक शास्त्र रामायणातील प्रभु राम, विष्णू, रावण, शिव यांच्या भूमिका साकारत इतर हिंदू देवांच्याही अनेक भूमिका साकारल्लया चित्रपटांमधील अविश्वसनीय कारकीर्दीनंतर, एनटीआर राजकारणाकडे वळले, त्यांनी त्यांचा राजकीय पक्ष, तेलुगु देसम पार्टी स्थापन केला आणि तीन टर्ममध्ये पुढील सात वर्षे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. NTR यांचे 18 जानेवारी 1996 रोजी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.