मुंबई : बॉलिवूडचं सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे अजय देवगण (Nysa Devgn) आणि काजोल. अजय-काजोलची जोडी प्रसिद्ध असण्यासोबत नेहमी चर्चेत देखील असते. या दोघांप्रमाणेच आता या दोघांची मुलगी न्याया देवगणही सध्या चांगलीच चर्चेत आहे.
न्यासा देवगणचा आज (20 एप्रिल) वाढदिवस (Nysa Devgn Happy Birthday) आहे. न्यासाने तिचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला आहे. तसंच न्यासा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. न्यासा तिच्या फॅशन स्टाइलमुळे देखील ओळखली जाते. तर तुम्हालाही स्टायलिश आणि युनिक लूक करायचा असतील तर तुम्ही न्यासाकडून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.
जर तुम्ही ट्रेडिशनल लुकसाठी बेस्ट एथनिक लुक शोधत असाल, तर तुम्ही न्यासाच्या वेगवेगळ्या लुकपासून नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. वरील फोटोमध्ये न्यासाने अतिशय सुंदर असे टैसल्ड कटआउट गाउन घातला आहे. या गाऊनमध्ये तिचा लूक अतिशय युनिक आणि स्टायलिश दिसत आहे. न्यासाचा हा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
पुढील फोटोत न्यासाने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. न्यासाप्रमाणे तुम्हीही हा लाल रंगाचा लेहेंगा ट्राय करू शकता. न्यासावर हा लेहेंगा खूपच सूट करतोय. या लेहेंग्याच्या स्ट्रॅपी ब्लाउजवर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे. न्यासाप्रमाणे हा लेहेंगा तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये नक्कीच परिधान करू शकता.
न्यासा आइस ब्लू रंगाच्या लेहेंग्यात खूपच क्यूट दिसत आहे. तिने या लेहेंग्यासोबत स्ट्रॅपी ब्लाउज घातला आहे. तसंच यावर ऑर्गेन्जा दुपट्टा स्टाइल केलेला आहे. या लेहेंग्यावर न्यासाने ट्रेडिशनल झुमके आणि चोकर नेकलेसने घालून तिचा हा लूक पूर्ण केला आहे. तर तुम्हालाही असा लूक करायचा असेल तर तुम्ही न्यासाचा लूक कॉपी करू शकता.
न्यासा या फोटोत ग्लिटर गोल्डन लेहेंग्यामध्ये दिसत आहे. लग्नसमारंभासाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी या प्रकारचा लेहेंगा एकदम परफेक्ट आहे. हा फ्लेयर्ड लेहेंगा स्ट्रेपी ब्लाउजसोबत परिधान केला जातो. तसंच न्यासाने या लेहेंग्यावर मॅचिंग कानातले घातले आहेत. तिचा हा लूक एकदम स्टायलिश दिसत आहे.
निळ्या आणि सोनेरी प्रिंटेड लेहेंग्यात न्यासाचा लूक एकदम किलर दिसत आहे. न्यासाने स्पॅगेटी-स्ट्रॅप ब्लाउजसोबत फ्लेयर्ड स्कर्ट परिधान केले आहे. त्यासोबत सुंदर असा दुपट्टा घेतला आहे. तर तुम्हीही न्यासाचा लूक ट्राय करु शकता. यामध्ये तुम्ही नक्कीच न्यासाप्रमाणे सुंदर आणि आकर्षक दिसाल.