‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री अदिती पोहनकर खऱ्याया आयुष्यात खूपच स्टाइलिश आहे. तिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं आहे.
वादळानंतर घराबाहेर पडलेली अदिती प्रचंड सुंदर दिसत होती.
या वेबसीरिजमध्ये अदितीनं पम्पीची भूमिका साकारली होती. या आधी तिनं ‘शी’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एक बोल्ड भूमिका पार पाडली होती.
हिंदी मराठी आणि तमिळ सिनेमांमध्ये अभिनय करणार्या आदिती पोहनकरसाठी 2020 हे वर्ष चांगलं होतं. या सीरिजमुळे तिला संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे.
अदितीनं संग्राम सिंगकडून कुस्ती शिकत आश्रमातमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारली.
आदितीकडे पहिलं तर कोणीही असं म्हणू शकणार नाही की ती या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाली आहे.
एका मुलाखतीत अदितीने खुलासा केला की तिने आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. मराठी चित्रपटात आणि आता वेब सीरिजमध्ये असलेल्या आदितीला अनेक वर्षांपासून पडद्यावर पैलवानची भूमिका साकारायची होती.