सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या वेबसिरीज येतायेत. अशीच एक वेबसिरीज म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’… या वेबसिरिजची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने बिब्बोजान हे पात्र साकारलं आहे. तिचं हे पात्र प्रेक्षकांना भावतं आहे. या वेबसिरीजमध्ये आदितीने ‘गजगामिनी वॉक’ केला आहे. तिच्या या नृत्यप्रकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. यावर अनेकांनी रील्सदेखील तयार केले आहेत. यावर एका मराठी तरूणीने केलेलं रील इन्साग्रामवर सध्या व्हायरल होतंय. तिचं हे 12 मिलियन लोकांनी पाहिलं आहे.
‘गजगामिनी वॉक’ चा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मराठी मुलगी कांची शिंदे हिने ‘गजगामिनी वॉक’ केला आहे. हे रील करताना कांचीने बिब्बोजान सारखाच पेहरावही केला आहे. हिरामंडी या सिरीजमध्ये आदिती राव हैदरी हिने घातला होता तसाच आऊटफिट कांची शिंदेने परिधान केलं आहे. कांचीचा’गजगामिनी वॉक’ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. नेटकऱ्यांनी कांचीची तुलना आदिती राव हैदरी हिच्या सोबत केलीय.
कांचीच्या ‘गजगामिनी वॉक’ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. नेटकऱ्यांनी कांचीच्या ‘गजगामिनी वॉक’ची तुलना अभिनेत्री आदिती राव हैदरीसोबत केली आहे. सेम टू सेम आदिती राव हैदरी!, असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तू ‘गजगामिनी वॉक’ला न्याय दिला आहेस. तू ‘गजगामिनी वॉक’ छान केलास. पण खरं तर कुणीही आदिती राव सारखं असू शकत नाहीत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
‘गजगामिनी वॉक’ मुळे चर्चेत आलेली कांची शिंदे ही अभिनेत्री आहे. कलर्स मराठीवरच्या ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ मालिकेत कांची मुख्य भूमिका साकारत आहे. अभिनयासोबतच तिला डान्सची देखील आवड आहे. कांची लावणी देखील करते. तिचं नृत्य चाहत्यांना आवडतं. सोशल मीडियावरही कांची अॅक्टिव्ह असते. तिचे रील्स ट्रेडिंग असतात. तसंच तिच्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळते.