मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतचा (Kanagana Ranaut ) लॉकअप शो (LockUpp Show) सध्या ओटीटीवरचा (OTT) सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो आहे. तिच्या शोमधल्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होते. या शोमधली स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Munnavar Farookhi) आणि अंजली अरोरा (Anajli Arora) ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरतेय. त्यांची मैत्री त्यांचं नातं सोशल मीडियावर चर्चेत आहे. अश्यातच आता कंगनाने मोठा खुलासा केला आहे. मुन्नवरचं आधीच लग्न झालं आहे. त्याला एक मुलगा ही आहे, असं कंगनाने सांगितलं आहे. यामुळे मुन्नवरसह अंजलीला मोठा धक्का बसला. अंजलीला या सगळ्याची कल्पनाच नसल्याने ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. या सगळ्यामुळे अंजली आणि मुन्नवरच्या नात्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असेल.
कंगना रानौतचा लॉकअप शो सध्या ओटीटीवरचा सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो आहे.या शोमधली स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि अंजली अरोरा ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरतेय.अश्यातच आता कंगनाने मोठा खुलासा केला आहे. मुन्नवरचं आधीच लग्न झालं आहे. त्याला एक मुलगा ही आहे, असं कंगनाने सांगितलं आहे. शिवाय सोशल मीडियावर या सगळ्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तू खरं काय ते सांग, यावर स्पष्टीकरण दे, असं कंगना त्याला सांगते. त्यावर मला याबाबत काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही, असं मुन्नवर म्हणतो. त्यामुळे अंजलीला मोठा धक्का बसलाय. या सगळ्याची कल्पनाच नसल्याने ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहते.
कंगना रनौतच्या या या खुलाश्यामुळे लॉकअप या कार्यक्रमात आणि अंजली मुन्नवरच्या नात्यात मोठा ट्विस्ट आलाय. आता या सगळ्याचा दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असेल. मुनव्वर फारुकी हा स्टँड-अप कॉमेडियन
आहे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तर अंजलीही इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तिचे कंगनापेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत. या दोघांची मैत्री चर्चेत आहे. शिवाय त्यांचं हे मैत्रीच्या पुढे जात असल्याचं पाहायला मिळत होतं. अश्यात आता या ट्विस्टमुळे हे नातं कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या