September OTT Release | ‘मनी हाईस्ट 5’ ते ‘मुंबई डायरीज 26/11’, सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाची मोठी मेजवानी!

| Updated on: Sep 02, 2021 | 7:25 AM

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या सर्व काही बंद आहे. त्याचा विशेष परिणाम चित्रपट जगतावरही दिसून आला. साथीच्या आजारामुळे चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला.

September OTT Release | ‘मनी हाईस्ट 5’ ते ‘मुंबई डायरीज 26/11’, सप्टेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाची मोठी मेजवानी!
OTT release
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या सर्व काही बंद आहे. त्याचा विशेष परिणाम चित्रपट जगतावरही दिसून आला. साथीच्या आजारामुळे चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. अशा परिस्थितीत, निर्मात्यांनी वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. पण, आता हे व्यासपीठ लोकांसाठी मनोरंजनाचे प्रमुख माध्यम बनले आहे.

गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, हॉटस्टारसारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची कमतरता नाही. आता ऑगस्ट महिना संपला आहे आणि सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. अशा स्थितीत, या आठवड्यात OTT वर रिलीज होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घेऊया…

मनी हाईस्ट 5

मनी हाईस्ट हा नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. आता या सीरीजचा शेवटचा पाचवा भाग येत आहे. पण हा पूर्ण असणार नाही. याचे दोन खंड असतील. ज्यात प्रत्येकात 5 भाग असतील. या सीझनचा पुढील भाग 3 डिसेंबर 2021 रोजी रिलीज होईल. शोमध्ये, प्रोफेसर आणि त्यची टीम चोरीच्या वेळी स्पॅनिश चित्रकार डालीचा मुखवटा घालते. जे आता जगभरातील उठावाचे प्रतीक बनले आहे. ‘मनी हाईस्ट’च्या माध्यमातून ‘बेला चाओ’ हे इटालियन गाणे पुन्हा लोकप्रिय संस्कृतीत दाखल झाले आहे.

मुंबई डायरीज 26/11

26 नोव्हेंबर 2008 ची रात्र, जिने संपूर्ण देशाला धक्का दिला. आजही ती भीषण रात्र आपल्या मनात जिवंत आहे. या सीरीजने 26/11च्या हल्ल्यांचे वेगवेगळ्या कोनातून चित्रण केले आहे. फिल्डवर उपस्थित पोलीस दलावर काय बेतलेले होते, ताज आणि ओबेरॉयमध्ये काम करणाऱ्यांनी हा हल्ला कसा पाहिला? हे यात दाखवले जाईल. 26/11च्या हल्ल्यांवर आधारित या वेब सीरीजचे नाव ‘मुंबई डायरीज 26/11’ आहे. ही सीरीज 9 सप्टेंबरपासून Amazon प्राईमवर पाहता येईल.

थलायवी

तामिळ चित्रपट आणि राजकारणातील मातब्बर व्यक्तिमत्व जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. जयललिता यांनी 10 वर्षात 100 चित्रपट दिले. अशीच काहीशी त्यांची राजकीय कारकीर्दही होती. एमजीआरला प्रेरणा मानून त्या राजकारणात सामील झाल्या आणि पुढे तमिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. ‘थलायवी’ जयललितांच्या जीवनातील चढ-उतारांवर आधारित चित्रपट आहे. कंगना रनौत यात मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर अभिनेते अरविंद स्वामी ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी एमजीआर यांच्या भूमिकेत दिसतील. 10 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ल्युसिफर सीझन 6

ल्युसिफरचा सीझन 6 पूर्वीपेक्षा अधिक मनोरंजक असणार आहे. यामध्ये बाप-मुलाचे काही सीन आहेत, जे खूप मजेदार आहेत आणि हृदयस्पर्शी देखील आहेत. या वेळी लेखकांनी पटकथा अधिक मनोरंजक बनवली असून, कलाकारांचा अभिनय आणखीन प्रेक्षणीय झाला आहे. ल्युसिफर अनेक ट्विस्ट्स आणि वळणांसह नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. 10 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो पाहता येईल.

अनकही कहानियां

नेटफ्लिक्सच्या या चित्रपटामध्ये प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यातील एका कथेत रिंकू राजगुरु झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू सोबतच या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘अनकही कहानिया’ नेटफ्लिक्सवर 17 सप्टेंबरला येत आहे.

भूत पोलिस

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चाहते त्याच्या ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामी गौतम (Yami Gautam) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) या चित्रपटात सैफ आणि अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भूत पोलीस 17 सप्टेंबरला डीज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटातून इंटीमेट सीन वगळला, जाणून घ्या कारण

OTT Release | ‘हेल्मेट’पासून ‘सिंड्रेला’पर्यंत, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची यादी