मुंबई : 2021ला सर्वांनी निरोप दिला आणि 2022चं जल्लोषात स्वागत झालं. गतवर्षीप्रमाणं या वर्षीही कोरोनाचा प्रभाव राहणारच आहे. त्यामुळे आपल्याला काही काळ अजून घरात कैदच राहावं लागणार आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही OTT प्लॅटफॉर्म (OTT) प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे. या वर्षी OTT प्लॅटफॉर्मवर कोणत्या मोठ्या वेब सिरीज (Web Series) आणि चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कौन बनेगी शिखरवती – ZEE5
कौटुंबिक ड्रामा असलेली वेब सिरीज कौन बनेगी शिखरवती या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. ही मालिका 7 जानेवारी 2022ला Zee5वर प्रसारित केली जाईल. यात नसीरुद्दीन शाह, लारा दत्ता, सोहा अली खान, कृतिका कामरा आणि अन्या सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात हलक्याफुलक्या कॉमेडीसह एक रंजक कथा दाखवण्यात येणार आहे.
ये काली आंखें – नेटफ्लिक्स (Netflix)
ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंग मुख्य भूमिकेत असल्यामुळे या वर्षातील बहुप्रतिक्षित वेब सिरीजच्या यादीत ती आहे. ही एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा आहे. यात तीन लोक एकमेकांना मिळवण्याच्या हव्यासात गुंतलेले आहेत, हे सिद्धार्थ सेन गुप्ता दिग्दर्शित करत आहेत. 14 जानेवारी 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.
ओझर्क सीझन 4 – नेटफ्लिक्स (Netflix)
नेटफ्लिक्सच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक, या सिरीजच्या चौथ्या सीझनची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत होता. ते 21 जानेवारी 2022 रोजी Netflixवर प्रसारित होईल. मनी लॉन्ड्रिंगवर आधारित ही क्राइम ड्रामा सिरीज आहे. एकाच कुटुंबातील अगणित हत्या हा विषय आहे. त्याच्या तिन्ही सिरीज प्रचंड हिट ठरल्या आहेत.
गहराइयां – अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime)
या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका पदुकोणचा चित्रपट सर्वात मोठा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा डिसेंबर 2021मध्ये झाली होती. हा चित्रपट 25 जानेवारी 22 रोजी Amazon Prime Videoवर प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शक सकून बत्रा आहेत. यात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत.
ह्यूमन – हॉट स्टार (disney+ hotstar)
विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित ‘ह्यूमन’ ही थ्रिलर सिरीज ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. ही औषध चाचणीवर आधारित असून, त्यात पैशाचा घाणेरडा खेळ दाखवण्यात आलाय. यात शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हाडी मुख्य भूमिकेत आहेत आणि 14 जानेवारी 2022ला ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
रुद्र – डिस्ने प्लस हॉट स्टार (disney+ hotstar)
या मालिकेद्वारे अजय देवगण पहिल्यांदाच वेब सीरिजच्या जगात पाऊल ठेवणार आहे. ही सिरीज ‘ल्युथर’ या इंग्रजी मालिकेचा अधिकृत रिमेक आहे. अजय देवगणसारख्या मोठ्या स्टारला ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याची रिलीजची तारीख जाहीर केली गेली नाही परंतु लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर ती प्रवाहित होईल, अशी अपेक्षा आहे.
स्कॅम 2003 – सोनी लिव्ह (Sony Liv)
2020मधील 1992च्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीजचा दुसरा सीझन याच वर्षी रिलीज होणार आहे. हन्सल मेहता यांच्या या सिरीजमध्ये एका नव्या घोटाळ्याची कथा असणार आहे. Sony Livवर ती प्रसारित होईल. याविषयी अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.
पंचायत सीझन 2 – अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime)
प्रेक्षक पंचायत 2ची आतुरतेनं वाट पाहत होते. ही वेब सिरीज खूप दिवसांपासून बनवली जातेय. त्याचं शूटिंग संपलंय. ही सिरीजही लवकरच Amazon Prime Videoवर प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.