मुंबई : कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता (Lockupp Show Winner) ठरला आहे. मुनव्वर फारुकी याने सर्वाधिक मतं मिळवत हा बहुमान आपल्या नावे केला. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. तो सुरुवातीपासूनच या शोमध्ये तगडा स्पर्धक राहिला आहे. कंगना रनौतच्या या लॉकअप शोमध्ये 70 दिवस हे सगळे स्पर्धक होते. याचा आता निकाल समोर आला आहे. मुनव्वर या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अंजली अरोरा, पायल रोहतगी आणि मुनव्वर फारुकी हे तीन टॉप 3 स्पर्धक होते.
कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकी याने सर्वाधिक मतं मिळवत हा बहुमान आपल्या नावे केला. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘लॉकअप’ हा बहुचर्चित शो 27 फेब्रुवारीला सुरु झाला. या शो मध्ये 20 स्पर्धक होते. यात शिवम शर्मा, पायल रोहतगी, आझम फलाह, मुनव्वर फारुकी, अंजली अरोरा आणि प्रिन्स नरुला यासारख्या अनेक कलाकार होते. अखेर याचा निकाल समोर आला. मुनव्वर विजेता ठरलाय.
‘लॉक अप’ या शोचा विजेता मुनावर फारुकीला विजेतेपदाची ट्रॉफी मिळाली आहे. शिवाय 20 लाख रुपये देण्यात आलेत. यासोबतच त्याला एक चमचमीत आलिशान कारही मिळाली आहे.
शो जिंकल्यानंतर मुनव्वरने आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत. मुनव्वर म्हणाला की, “मला वाटायचं की मी ही स्पर्धा जिंकावी. त्याचसाठी मी इथे आलो होतो. पण फिनाले जवळ आला तसतशी धाकधुक वाढू लागली… दोन दिवस मी झोपलो देखील नाही. मी घाबरलो होतो. पण आता मस्त वाटतंय. मला मत देणाऱ्यांचे मनापासून आभार तुमच्यामुळे ही ट्रॉफी माझ्याकडे आली.”
मुनव्वर हा कॉमेडियन आहे. तो त्याचे काही कार्यक्रमही करतो. गुजरातला त्याचा कार्यक्रम होता. त्याआधीच्या कार्यक्रमात त्याने बजरंग दलाला उद्देशून काही टिपण्णी केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे त्याचा गुजरातमधला कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका बजरंग दलाने घेतली होती. त्यानंतर खूप वादही निर्माण झाला होता. त्याच्या कार्यक्रमातून तो द्वेष पसरवत असल्याचा आरोप कायम लावला जातो. त्याच्या अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी याआधी करण्यात आली आहे. तो लॉकअप शोमध्ये देखील तसाच बिन्धास्त अंदाजात पाहायला मिळाला.