मुंबई : ‘झी मराठी’च्या मालिका आणि शीर्षक गीतांचं प्रेक्षकांशी असलेलं नातं तसं खूप जूनं आहे. यातील नवी असो वा जुनी सगळ्या मालिकांची गाणी प्रेक्षकांच्या आणि रसिकांच्या मनात आणि कानांत आजही वाजत असतात. म्युझिक अल्बम आणि चित्रपटांसोबत मालिकांची शीर्षकगीतं रसिकांचं लक्ष वेधून घेतात. अनेकदा मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात पण वर्षानुवर्षे त्यांची शीर्षकगीतं प्रेक्षकांच्या ओठी तशीच असतात (pahile na mi tula new serial title song making video).
या वहिनीवरील ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’ पासून ते आता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ पर्यंत अनेक मालिकांची शीर्षकगीतं आजवर गाजली आणि अजरामर झाली. कॉलर ट्यून, रिंग टोनच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या हृदया जवळ राहिली. काही गाणी तर अगदी सर्व समारंभात ही गाणी वाजवली गेली.
याच परंपरेप्रमाणे सध्या चालू असलेल्या मालिकांमध्ये ‘लाडाची मी लेक गं’, ‘कारभारी लयभारी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अग्गबाई सासूबाई’, ‘माझा होशील ना’, ‘देवमाणूस’ आणि नुकतीच सुरु झालेली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांची शीर्षकगीतं देखील खूप गाजतयात. त्यातच आता आणखी एका शीर्षकगीताची भर पडली आहे. ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र त्यापूर्वी या मालिकेचं शीर्षकगीत सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. अभिनेता शशांक केतकरने हा व्हिडीओ शेअर केला आहे (pahile na mi tula new serial title song making video).
‘पाहिले न मी तुला’ या मालिकेचं शीर्षकगीत आनंदी जोशीने गायलं असून वैभव जोशींनी गीत लिहिलं आहे. तर, संगीतकार समीर सप्तिस्कर यांनी ते संगीतबद्ध केलंय. सोशल मीडियावर या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून, अनेकांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या लोकप्रिय वाहिनेने सोशल मीडियावर हे गाणं कसं संगीतबद्ध झालंय, त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मालिकेचं एखादं शीर्षकगीत लोकांच्या तोंडी राहावं म्हणून त्यामागे किती मेहनत आणि किती हात काम करत असतात, याचा अंदाज आपल्याला या व्हिडीओतून घेता येतो.
या मालिकेच्या माध्यमातून ‘हँडसम हँक’ शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. शशांकसोबत या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले आणि ‘माझा होशील ना? फेम ‘सुयश’ अर्थात अभिनेता आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारत आहेत. शशांकने याआधी मालिकेचा प्रोमो शेअर करत, ‘आता कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे’, असं गमतीनं म्हटलं होतं. नुकताच मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आहे आणि मालिकेला रसिक प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यापुढे दररोज संध्याकाळी 7 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(pahile na mi tula new serial title song making video)
Rakhi Sawant Cheating Case | राखी सावंतसह भावावरही FIR दाखल, वाचा काय आहे ‘हे’ प्रकरण?