मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘OMG 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आत्तापर्यंत ज्यांनी पाहिला आहे, त्यांनी याचे बरेच कौतुक केले आहे. चित्रपटात देण्यात आलेला संदेशही लोकांना बराच आवडला आहे. मात्र या चित्रपटावर प्रदर्शनाआधीच बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने तो चर्चेत आला होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पंकज त्रिपाठी यांच्या सांगण्यानुसार, त्यांचं डोकं बरोबर काम करत आहे, ते चांगली स्क्रिप्ट वाचून चित्रपट करण्याचा निर्णय घेतात. एखादी चांगली स्क्रिप्ट आली, तर ते ती सोडत नाही. पंकज यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांना उजाळा दिला. तेव्हा मी चांगल्या संधीसाठी संघर्ष करत होतो, त्यामुळे चांगली स्क्रिप्ट निवडण्याच्या स्थितीत नव्हतो, मला फक्त एक संधी हवी होती.
मात्र, आता जेव्हा एखादी चांगली स्क्रिप्ट ऐकतो, तेव्हा माझ्याकडे वेळ नसला तरी मी त्यासाठी नक्कीच वेळ काढतो. कारण अशा कथा महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पंकज त्रिपाठी यांनी आधी OMG 2 करण्यास नकार दिला होता. तीन-चार महिने त्याच्यांकडे अजिबात वेळ नव्हता. पण निर्मात्यांनी त्यांची पुन्हा भेट घेतली आणि कथा पुन्हा एकदा ऐकून मग निर्णय घेण्यास सांगितले, असे पंकज त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
त्या मीटिंगनंतर त्यांनी काही दिवसांचा अवधी मागितला आणि तिसऱ्या दिवशीच त्यांनी OMG 2 साठी 55 दिवसांचे शेड्युल आखले. त्यांना हा चित्रपट करणं गरजेंच वाटलं. या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे.