मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या ‘सायना‘ चित्रपटाचा ट्रेलर आज महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम असून, प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परिणीतीचा चित्रपटातला उत्साह या जबरदस्त ट्रेलरमधून दिसून येत आहे. परिणीती चोप्राचा हा पहिलाच बायोपिक चित्रपट आहे (Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion).
ट्रेलरची सुरूवात, सायनाच्या आईच्या भूमिकेत दिसणाऱ्या मेघना मलिक यांच्या पासून होते. हरियाणवी अॅक्सेंटमध्ये संवाद बोलत, लहानग्या सायनाला बॅडमिंटन स्टार होण्याची स्वप्ने त्या दाखवत आहेत. ज्यामध्ये त्या अप्रतिम दिसत आहेत. यानंतर बॅडमिंटन स्टार बनण्यासाठी सायनाचा प्रवास आणि संघर्ष सुरू होतो. परिणीती चोप्रा बर्याच दृश्यांमध्ये सायना प्रमाणे चुलबुली दिसण्याऐवजी एकदम भोळी दिसली आहे.
सायनाची भूमिका साकारताना परिणीती म्हणाली, ‘सायना नेहवालसारख्या एखाद्या व्यक्तीला पडद्यावर व्यक्त करणे ही मोठी जबाबदारी आहे. ती एक आख्यायिका आहे आणि लोक काय प्रतिक्रिया देतील याबद्दल मला खूप भीती वाटली होती. परंतु, जगभरातून येणाऱ्या उदंड प्रतिसादाबद्दल मी त्यांची आभारी आहे. हा चित्रपट प्रत्येक स्त्रीमधील सुप्त भावनेचा उत्सव आहे.’
त्याच वेळी सायना म्हणाली, ‘चित्रपटातील प्रत्येक गोष्ट अगदी वास्तविक आहे. मी माझ्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे, ते फक्त माझ्या कुटुंबाच्या भक्कम सहकार्यामुळे शक्य झाले आहे. अशा मोठ्या खेळाचा भाग होणं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, जी मला खूप आवडते आणि माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझ्या देशाला एका चांगल्या उंचीवर नेण्यासाठी योगदान देऊ शकले. परिणीती एक हुशार अभिनेत्री आहे. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला कळले नाही की, आम्ही दोघी कधी मैत्रिणी झालो. मी या चित्रपटासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा देते आणि सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी मी आशा करते (Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion).
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सायनाची कामगिरी आणि तिच्या संघर्षाची कहाणी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा टीझर शेअर करत परिणीतीने “सायनाचा टीझर, आता ट्रेलरही लवकरच!” असे कॅप्शन लिहिले होते. परिणीतीशिवाय बँडमिंटनपटू सायना नेहवालनेही तिच्या सोशल मीडिया हँडलवर हा टीझर पोस्ट केला होता. तिच्या स्वत:च्या संघर्षांवर आधारित या सिनेमाचा तिला प्रचंड अभिमान वाटतो. हा तिच्यासाठी देखील एक भावनिक क्षण आहे. याचा उल्लेख त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला होता
यापूर्वी अशी बातमी आली होती की, चित्रपट निर्माते अमोल गुप्ते दिग्दर्शित या बायोपिकसाठी सुरुवातील अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॅडमिंटन टीमचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे जवळपास दीड महिना प्रशिक्षण घेतले होते, जेणेकरुन ती सायनाच्या भूमिकेसाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करू शकेल. सप्टेंबर 2018मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, परंतु डेंग्यूमुळे श्रद्धाला शूटिंग मधेच थांबवावे लागले. यानंतर, जेव्हा श्रद्धा सावरली, तिचे वेळापत्रक खूप व्यस्त होते, ज्यामुळे ती या बायोपिकला वेळ देऊ शकली नाही(Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion)’
गत वर्षी प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘केसरी’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतला होता. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बहुमान मिळवला होता. ‘केसरी’ने पहिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. सध्या परिणीती चोप्रा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’च्या कामात व्यस्त आहे.
(Parineeti Chopra starrer film Saina Trailer released on womens day occasion)
Marathi Movie : गंभीर विषयावर गमतीशीर चित्रपट, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Vamika | ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने विराट कोहलीची लेकीसाठी खास पोस्ट, वाचा काय म्हणाला विराट…@imVkohli | @AnushkaSharma | #AnushkaSharma | #vamika | #womenpower | #womensday2021 https://t.co/5KAwt0hJdp
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021