अनेक फ्लॉप चित्रपट,रणबीरसोबतचा सिनेमा नाकारला, खासदाराशी लग्न केलं; बॉलिवूड अभिनेत्रीचं पुन्हा कमबॅक

| Updated on: Jan 06, 2025 | 2:05 PM

अशी एक अभिनेत्री जिचे एक किंवा दोनच चित्रपट चालले अन् तब्बल 9 चित्रपट फ्लॉपच्या लिस्टमध्ये आले. तरीही ती बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ठरली एवढच नाही तर, तिच्या लव्हलाइफमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. तिने एका राजकिय नेत्यासोबत लग्न केल्यानंतर तर सर्वत्रच तिची चर्चा होऊ लागली.

अनेक फ्लॉप चित्रपट,रणबीरसोबतचा सिनेमा नाकारला, खासदाराशी लग्न केलं; बॉलिवूड अभिनेत्रीचं पुन्हा कमबॅक
Follow us on

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला जोडीदार म्हणून वेगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींचा विचार केला आहे. आणि त्यांनी लग्नानंतर काही काळापर्यंत तरी संपूर्णपणे फक्त आपल्या संसाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं मानलं तर

अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर आपलं करिअर सोडलं आणि पूर्ण वेळ फक्त आपल्या घरासाठी दिला आहे. अशी बरची उदाहरणे आपल्याला बॉलिवूडमध्ये सापडतील.

करिअरची सुरुवातच हिट चित्रपटाने

सध्या अशाच एका अभनेत्रीची चर्चा आहे. जिच्या करिअरची सुरुवातच हिट चित्रपट देऊन झाली. पण नंतर मात्र तिचे बॅक टू बॅक अनेक सिनेमे फ्लॉपच ठरले.9 फ्लॉप चित्रपट दिले.

त्यानंतर रणबीर सोबतचा एक सिनेमाही तिने नाकारला. ज्या सिनेमाने तब्बल 1000 कोटींच्या जवळ पोहोचला होता.एवढच नाही तर या अभिनेत्रीची सर्वात जास्त चर्चा तेव्हा झाली जेव्हा तिने एका राजकिय नेत्याशी लग्न केलं.

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत तिचं नाव आहे बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा. अनेक फ्लॉप चित्रपट असूनही काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. परिणिती चोप्रा याचे उत्तम उदाहरण आहे. अयशस्वी चित्रपट देऊनही तिची गणना अव्वल आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्येच केली जाते.


9 चित्रपट फ्लॉप

परिणीतीने 2011 मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ मधून पदार्पण केले. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांनी ‘इशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘हसी तो फसी’ सारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर परिणीती चोप्राने दावत-ए-इश्क , किल दिल , मेरी प्यारी बिंदू , नमस्ते इंग्लंड यासह सुमारे चित्रपट दिले. पण ते फ्लॉप ठरले.

ज्यामुळे तिचे करिअर धोक्यात आले होते. एवढच नाही तर परिणीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला ‘ॲनिमल’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण तिने तो नाकारला. जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. परिणीती चोप्राने तिच्या या कठीण काळातही संयम राखला तिचे प्रयत्न सुरुच ठेवले.

खासदारसोबत लग्न अन्…

परिणीतीची चर्चा जेवढी तिच्या चित्रपटांमुळे झाला नाही तेवढी तिच्या अफेअर आणि तिच्या लग्नामुळे झाली. ‘आप’ नेते तथा खासदार राघव चढ्ढासोबत तिच्या अफेअर्समुळे ती अजूनच चर्चेत आली. अखेर त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले आणि त्यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूर येथे या जोडीने लग्न केले.

अॅनिमल चित्रपट नाकारला

राघव चढ्ढासोबत लग्न केल्यानंतर आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाल्याचे तिने म्हटलं. एका मुलाखतीत परिणीतीने नवऱ्याचं तोंडभरून कौतुकही केलं होतं. एवढच नाही लग्नानंतर तिने चमकिला चित्रपटाद्वारे दमदार कमबॅक केलं आणि बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

या चित्रपटाचं आणि तिच्या अभिनयाचं कौतुकच झालं. तसेच अॅनिमल चित्रपट नाकारल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं परिणीती सांगते.