क्रिकेट ते बॉलिवूड; नवाब सैफ अली खानचे पतौडी घराणे अन् पतौडी पॅलेसचा इतिहास

| Updated on: Jan 16, 2025 | 4:27 PM

सैफ अली खानच्या पतौडी घराण्याची चर्चा रंगली आहे. हाय-प्रोफाइल लग्न ते गडगंज श्रीमंतीपर्यंत या पतौडी घराण्याची चर्चा नेहमीच होत असते. क्रिकेटपासून ते बॉलिवूडपर्यंत, पतौडी कुटुंबातील नवाब सैफ अली खानचे घराणं कसं आहे याबद्दल जाणून घेऊयात.

क्रिकेट ते बॉलिवूड; नवाब सैफ अली खानचे पतौडी घराणे अन् पतौडी पॅलेसचा इतिहास
Follow us on

सैफ अली खानवरील हल्ला हा चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींसाठीही एक मोठा धक्का आहे. या हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान सैफ अली खानच्या पतौडी कुटुंबाबद्दल काही अनेक खास गोष्टी चाहत्यांना माहित नसतील. क्रिकेटपासून ते बॉलिवूडपर्यंत, पतौडी कुटुंबातील नवाब सैफ अली खानचं घराणं कसं आहे याबद्दल जाणून घेऊयात.

सैफ अली खानच्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात

पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खान यांच्या घरात अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचे लग्न हे या घरातील पहिले हाय-प्रोफाइल लग्न आहे. या लग्नाची आणि त्यानंतरच्या सर्व पिढ्यांनी बॉलिवूडमध्येही चर्चा झाली. शर्मिला टागोरचे आई-वडील दोघेही नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे नातेवाईक होते.

मन्सूर अली खान पतौडी:
आज भारतातील दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक मन्सूर अली खान पतौडी यांच्या कुटुंबाची क्रिकेट जगतापासून बॉलिवूडपर्यंत सर्वत्र चर्चा आहे. मन्सूर अली खान आणि शर्मिला यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.

शर्मिला टागोर
सैफ अली खानची आई शर्मिला टागोर ही कलकत्त्याच्या एका प्रसिद्ध कुटुंबातील मुलगी आहे, जी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे नातेवाईक असल्याचं म्हटलं जाते. शर्मिला टागोर यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘अनुपमा’, ‘मौसम’ सारख्या हिट चित्रपट केले. शर्मिला यांची मोठी मुलगी सबा अली खान चित्रपटांपासून मात्र दूर आहे.

नवाब मुलगा सैफ अली खान
सैफ अली खाननेही बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आहे, ‘कल हो ना हो’, ‘हम साथ साथ है’, ‘मैं खिलाडी तू अनारी’ यांसारख्या हीट चित्रपट त्याने दिले, ‘दिल चाहता है’, ‘परंपरा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

अमृता सिंग
सैफ अली खानने पहिले लग्न अमृता सिंगशी केले होते जी बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक हीट चित्रपट दिले. एवढच नाही तर ती तिच्या काळात तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती.

करीना कपूर खान
अभिनेत्री अमृता सिंगपासून विभक्त झाल्यानंतर सैफने रणधीर कपूर आणि बबिता यांची मुलगी करीना कपूरसोबत लग्न केलं. करिनाने इंडस्ट्रीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटही केले आहेत. सैफ आणि करीनाला दोन मुले आहेत.

सारा अली खान
ही सैफ आणि अमृताची मुलगी सारा अली खान आहे. सारा तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे चर्चेत असते. साराने देखील उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

इब्राहिम अली खान
सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम अली खान स्वतःच एक स्टार आहे, तो त्याच्या वडिलांना फॉलो करतो. इब्राहिम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.

तैमूर आणि जेह अली खान
करीना आणि सैफचा मुलगा तैमूर अली खान देखील सोशल मीडियावर चर्चेत असतो. जेह अली खान हा करीना आणि सैफचा धाकटा मुलगा आहे, जेह देखील आपल्या खोडकरपणाने पापाराझींचे लक्ष वेधून घेतो.

सोहा अली खान
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान यांची मुलगी सोहा अली खान देखील तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोहा अली खान ‘आहिस्ता-आहिस्ता’, ‘शादी नंबर वन’, ‘तुम मिले’, ’31 ऑक्टोबर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र आता ती चित्रपटांपासून दूर असते.

कुणाल खेमू
अभिनेता कुणाल खेमूने सोहासोबत लग्न केले आहे. सोहा आणि कुणालच्या मुलीचे नाव इनाया आहे. त्यामुळे तो सुद्धा आता पतौडी घराण्याशी जोडला गेला आहे.

पतौडी पॅलेसचा खास इतिहास
पतौडी पॅलेसचा इतिहास खूप खास आहे. पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. इथे घोड्यांचा तबेला, सुंदर गार्डन आणि एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. पॅलेसमध्ये अनेक पेंटींग्स आहेत. पतौडी पॅलेसमध्ये एक बिलियर्डस रुमही आहे. पॅलेसमध्ये अनेक पेंटींग्स आहेत.

पतौडी पॅलेसमध्ये एक बिलियर्डस रुमही आहे. सैफ अली खानने काही वर्षांपूर्वी पतौडी पॅलेसचे रिनोव्हेशन केले होते. या पॅलेसबाहेरील गार्डन आणि बाहेरच्या भागात लग्नही होतात. पतौडी पॅलेसमध्ये लग्न आणि चित्रपट शूटींगसाठी आकारण्यात आलेल्या भाड्यातून सैफ अली खानला पैसे मिळतात.