लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अभिनेता सलमान खानला अनेकवेळा धमकीचे मेसेज प्राप्त झाले आहेत. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सलमान खानला पुन्हा एकदा धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली. आता या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती मोठं यश लागलं आहे.सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं लोकेश पोलिसांनी ट्रेस केलं आहे. सलमान खानला कर्नाटकमधून धमकी आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे, हा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला प्राप्त झाला होता. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. ज्या लोकेशनवरून सलमान खानसाठी धमकीचा मेसेज आला होता, ते लोकेश ट्रॅक करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू होता. शेवटी पोलिसांना या व्यक्तीचं लोकेशन सापडलं आहे. या वक्तीनं कर्नाटकमधून सलमान खानला धमकीचा मेसज पाठवला होता. ज्या सीम कार्डवरून हा मेसेज पाठवण्यात आला होता, ते सीम कार्ड व्यंकटेश नावाच्या व्यक्तीचं असल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित व्यक्तीचं लोकेशन मिळाल्यानंतर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सलमान खानला धमकीचा मेसेज ज्या व्यक्तीनं पाठवला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक कर्नाटकला रवाना झालं आहे.त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती आणखी काही माहिती लागते का हे पाहावं लागणार आहे.
धमकीमध्ये काय म्हटलं?
सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. ज्या व्यक्तीनं हा मेसेज पाठवला त्यामध्ये त्याने म्हटलं की, ज्या व्यक्तीने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईवर गानं लिहीलं आहे, त्याला आम्ही सोडणार नाही.ज्याने गाणं लिहीलं आहे, त्याला एक महिन्याच्या आता मारून टाकू, त्याची हालत आम्ही अशी करू की तो त्याचं नाव देखील कधीच लिहू शकणार नाही. सलमान खानमध्ये हिंमत असेल तर त्याने त्या व्यक्तीला वाचवावं असं या मेसेजमध्ये म्हटलं होतं. तसेच त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचं नाव देखील लिहिण्यात आलं होतं.