अभिनेत्री प्राजक्ता माळी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. तिचं सुत्रसंचालन असो, तिचा चित्रपट असो किंवा तिने मुलाखतींमध्ये सांगितलेले किस्से असो तसेच तिचा अध्यात्माचा प्रवास असो अशा बऱ्याच कारणांवरून चर्चेचा विषय ठरते. प्राजक्ताने आजपर्यंत जेवढ्या मुलाखती दिल्या आहेत. त्यासर्वांमधील तिचं कोणते ना कोणते वक्तव्य व्हायरल झालेलंच आहे.
प्राजक्ता माळीचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
एवढंच नाही तर प्राजक्ता सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता नुकत्याच एका मुलाखतीतील प्राजक्ताचे एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलंय. प्राजक्ताने या मुलाखतीत महिलांच्या आर्थिक सक्षमिकरणाबद्दल तिने वक्तव्य केलं असून महिलांना खास सल्लाही दिला आहे.
“जे तुम्हाला करावसं वाटतंय त्या गोष्टीला जरूर न्याय द्या”
प्राजक्ताने या मुलाखतीत म्हटलं की, “जे तुम्हाला करावसं वाटतंय त्या गोष्टीला जरूर न्याय द्या. मार्ग निघतील, नसेल तर तुम्ही मार्ग काढा आणि महिला करू शकत नाही, अशी कुठलीही गोष्ट नाहीये. महिला अष्ठावधीनी असते, ती एका वेळी आठ-आठ गोष्टी करू शकते. त्यामुळे हा प्रश्नच नाही की जमेल की नाही.” असं म्हणत तिने महिलांना प्रोत्साहन दिलं.
“संसार, वय, पोरं सगळं बाजूला…”
पुढे प्राजक्ता म्हणाली, “संसार, वय, पोरं सगळं बाजूला ठेऊनसुद्धा तुम्ही तुमची स्वप्नं साकार करू शकता आणि वय तर विषयच बाजूला ठेवा. वय वैगेरे असं काही नसतं. मात्र, प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर पन्नाशीत गेल्यानंतरही तुम्ही नवीन काहीतरी सुरू करू शकता आणि करायलाच पाहिजे. तुम्हाला आतून ऊर्मी येतेय, तर तुम्ही ते केलंच पाहिजे.” असं म्हणत तिने महिलांनी लग्न झाल्यानंतरही आपल्या आवडीच्या गोष्टींना विसरून जाऊ नये असा सल्ला दिला आहे.
“आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे”
पुढे तिने महिलांच्या आर्थिक सक्षमिकरमाबद्दल ही वक्तव्य केलं. “सगळ्या महिलांनी आर्थिक स्वावलंबी असलं पाहिजे, या मताची मी आहे. कारण ती गोष्ट असल्यानंतर तुम्हाला आपसूक घरामध्ये आदर मिळतो. तुमच्या मताला महत्त्व मिळतं. तुम्ही इतरांवर कमी अवलंबून असता, तुमच्याच जीवाला ते बरं वाटतं, तेवढी गोष्ट असण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा”.
प्राडक्ताने‘फुलवंती’या चित्रपटामुळे प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू दाखवली. या चित्रपटाची ती निर्मातीही होती. या चित्रपटातून प्राक्ताने अभिनयाबरोबरच तिच्या नृत्यानेही प्रेक्षकांचे मन जिंकले. आता ती पुन्हा एकदा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आणि हटक्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.