सध्या राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाच्या या संकटात प्रत्येक जण जमेल ती मदत करण्यासाठी पुढे येतंय. त्यातच सध्या प्लाझ्मा आणि रक्ताची मोठी गरज राज्याला आहे. ही बाब लक्षात घेता आता तुमचे लाडके कलाकार रक्तदान करत आहेत.
आता नुकतंच प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी रक्तदान केलं आहे.
प्रिया आणि उमेशला काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं दोघांनी रक्त दान केलं आहे.
रक्तदान करतानाचे हे फोटो आता दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटो सोबतच प्रियानं तिचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.