न्यूयॉर्क : प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) हे ग्लिट्झ आणि ग्लॅमरसाठी नवीन नाव नाही. अभिनेत्री तिच्या जबरदस्त व्यक्तीमत्वामुळे अनेकदा चर्चेत असते. बॉलिवूडप्रमाणेच तिने हॉलिवूडमध्येही ठसा उमटवला असून प्रियांका आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या प्रियांकाचा मेट गाला इव्हेंट 2023 चा (Met Gala 2023) लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रियांकाने पती निक जोनाससह ट्विनिंग केले होते. प्रियांकाने काळ्या रंगाचा व्हॅलेंटिनो थाय-हाय स्लिट गाऊन घातला होता. मात्र तिच्या ड्रेसपेक्षाही सर्वांच्या नजरा तिच्या हिऱ्याच्या नेकलेसवर (Diamond necklace price) खिळल्या होत्या.
मेट गालामध्ये प्रियांकाने घातला सर्वात महागडा नेकलेस
मेट गाला 2023 मध्ये ग्लोबल आयकॉन असणाऱ्या प्रियांकाने 11.6-कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. हा स्टेटमेंट पीस बुल्गारीचा आहे. पण त्या नेकलेसपेक्षाही, त्याच्या किंमतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. व्हायरल होत असलेल्या ट्विटनुसार, प्रियांकाच्या या नेकलेसची किंमत 25 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे. “मेट गालानंतर प्रियंका चोप्राच्या 25 मिलियन डॉलर्सच्या बल्गारी नेकलेसचा लिलाव केला जाईल.” असे ट्विटमध्ये नमूद केले आहे.
Her $25 million @Bulgariofficial necklace is going to be auctioned off after #MetGala @priyankachopra pic.twitter.com/LK0otVUHea
— SAMBIT ⚡ (@GirlDontYell) May 2, 2023
गाला इव्हेंटमध्ये प्रियांकाचे जोरदार स्वागत
विशेष म्हणजे, जेव्हा प्रियांकाने बोल्ड गाऊनमध्ये गाला इव्हेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा तिचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. या अभिनेत्रीसोबत तिचा पती अमेरिकन पॉप स्टार निक जोनासही होता. प्रियांका पतीचा हात धरून मेट गाला येथे पोहोचली. यादरम्यान, या जोडप्याने रेड कार्पेटवर पोज दिली.
आगामी भूमिका
कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले तर , प्रियंका तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अमेरिकन वेब सीरिज ‘सिटाडेल’साठी चर्चेत आहे. ॲक्शन थ्रिलर मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. प्राइम व्हिडीओ वेब सीरिज ‘सिटाडेल’ मध्ये रिचर्ड मॅडेन, स्टॅनले टुसी आणि लेस्ली मॅनविले देखील आहेत. दुसरीकडे, वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीत असतील. प्रियांकाचा रोमँटिक कॉमेडी ‘लव्ह अगेन’ हा चित्रपटही याच महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत सॅम ह्युघन आणि सेलीन डिऑन देखील आहेत. ती फरहान अख्तरच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.