मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. प्रियांका चोप्रा ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं फक्त बॉलीवूड नाही तर हॉलीवुड देखील स्वतःच्या अभिनयाने गाजवलं आहे. आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचा चहात वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्य मुळे देखील नेहमी चर्चेत असते.
प्रियांका तिचे आणि तिच्या परिवाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. आताही प्रियांका चोप्राने एक फोटो शेअर केला आहे ज्याचा उल्लेख तिने तिचं संपूर्ण जग असा केला आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
प्रियांका चोप्रा नेहमी सोशल मीडियावर तिचा पती निक जोनस आणि तिची मुलगी मालती सोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. आताही प्रियंकानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
आजकाल प्रियांका तिची लेक मालतीसोबत मोठ्या प्रमाणात वेळ घालवताना दिसते. ती मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाही. ती आजकाल तिच्या मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही तिने मालतीच्या पायाचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला तिनं माझं संपूर्ण जग असं कॅप्शन दिलं आहे. सध्या प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे.
दरम्यान, प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिची मुलगी तिच्यासाठी तिचं संपूर्ण आयुष्य आहे. तसंच ती तिच्या मुलीसाठी तिचं काम, आपला देश आणि सर्वकाही सोडू शकते.