‘पुष्पा 2’ची खतरनाक क्रेझ; अवघ्या 3 तासांत 15,000 तिकिटांची अॅडवान्स बुकींग, प्रभास अन् शाहरुखचा रेकॉर्ड मोडणार

| Updated on: Dec 02, 2024 | 3:01 PM

पुष्पा 2 च्या प्रदर्शनाआधीच तिकिटांची विक्रीने धुमाकूळ घातला आहे. अवघ्या 3 तासांत 15,000 तिकिटांची एडव्हान्स बुकिंग झाली आहेत. PVR आणि INOX सारख्या मोठ्या सिनेमागृहांनी चांगली विक्री झाली आहे. हे पाहता, पुष्पा 2 बाहुबली 2 आणि पठाण सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकतो असा अंदाज आहे.

पुष्पा 2ची खतरनाक क्रेझ; अवघ्या 3 तासांत 15,000 तिकिटांची अॅडवान्स बुकींग, प्रभास अन् शाहरुखचा रेकॉर्ड मोडणार
Follow us on

पुष्पा 2 ची क्रेझ आपल्या सर्वांनाच माहित आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार यात शंकाच नाही. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला तेव्हापासून या चित्रपटाने रिलीज आधीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. एवढच नाही तर ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अॅडवान्स बुकींगही केल्याचे पाहायला मिळत आहे.

अवघ्या तीन तासांत 15,000 तिकिटांची अॅडवान्स बुकींग

अल्लू अर्जुनचा तब्बल तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ‘पुष्पा 2’ प्रेक्षकां भेटीला आला आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकही तेवढे उत्सुक आहेत. पुष्पा 2 च्या अॅडवान्स बुकींगवरून प्रेक्षकांची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याबद्दलची आणखी एक अपडेट समोर आली आहे. पुष्पा 2 ची 3 तासांच्या आत चित्रपटाची तिकिट विक्री चांगली झालेली पाहायला मिळते.

शनिवार 30 नोव्हेंबर 2024 पासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चेन्समध्ये ‘पुष्पा 2’ चे अॅडवान्स बुकिंग सुरू झाले आहेत. बुकिंग सुरू होताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अवघ्या 3 तासांत या चित्रपटाच्या वेगवेगळ्या चेन्समध्ये 15,000 तिकिटे विकली गेली. PVR आणि INOX यांची मिळून 12,500 तिकिटे विकली गेली, तर सिनेपोलिसची 2,500 तिकिटे विकली गेली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवसाच्या अखेरीस किंवा अॅडवान्स बुकिंगच्या सुरुवातीच्या दिवशी 30,000 ते 35,000 तिकिटे विकली जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

प्रभास आणि शाहरुखचा रेकॉर्ड मोडणार 

पुष्पा 2 च्या रिलीजला 4 दिवस बाकी आहेत. 5 डिसेंबर 2024 हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चार दिवसांत आता किती तिकटे विकली जातायत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याची अडवान्स बुकींग पाहता हा चित्रपट प्रभासच्या बाहुबली 2 आणि शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ तसेच यशच्या KGF Chapter 2 चित्रपाचे रेकॉर्ड मोडणार असंचं चित्र पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटापासून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे आता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना प्रेक्षकांच्या या अपेक्षेला उतरणार का ?हे पाहणे औत्सुक्यचं ठरणार आहे.