‘पुष्पा 2’ प्रेक्षकांना कसा वाटला? कमेंट पाहून प्रश्न पडेल पाहायचा कि नाही

| Updated on: Dec 05, 2024 | 6:49 PM

'पुष्पा 2' च्या बाबतीत प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत हे नक्कीच जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र प्रेक्षकांनी दिलेल्या कमेंटस् पाहून नक्कीच प्रश्न पडतो की चित्रपट पाहावा की नाही.

पुष्पा 2 प्रेक्षकांना कसा वाटला? कमेंट पाहून प्रश्न पडेल पाहायचा कि नाही
Follow us on

बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ अखेर आज 5 डिसेंबर 2024 रोजी रिलीज झाला आहे. पुष्पाचा पहिला भाग सुपरहिट ठरल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रचंड आतुरता होती. जेव्हा पुष्पा 2 चा ट्रेलर लॉंच झाला तेव्हा प्रेक्षकांना तो इतका आवडाल कधी तिकीट बुक करतोय असं झालं होतं. प्रेक्षकांनी चित्रपट रिलीजच्या आधीच ऍडव्हान्स बुकिंगही करून ठेवली होती.

पुष्पा च्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांच्या ‘पुष्पा 2’च्या बाबत फारच अपेक्षा होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा चित्रपट हाऊसफुल्ल होणार हे माहित होतं. आणि झालंही तसेच. पण आता थिएटरमध्ये प्रत्यक्षात चित्रपट पाहून आल्यानंतर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहुयात.

पुष्पा 2 पाहून आल्यानंतर प्रेक्षकांनी ऑनलाइन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत . तर एकंदरीत ‘पुष्पा 2’ ला संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत.
ट्विटरवर ट्वीट करत नेटकऱ्यांनी हा चित्रपट नेमका कसा आहे हे सांगितलं आहे.

काही नेटकऱ्यांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे. प्रेक्षक चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत करत आहेत. अल्लू अर्जुनने नेहमीप्रमाणे सगळ्यांना आपल्या अभिनयाने अक्षरशः वेड लावलं आहे. त्याचा देवीच्या अवतारातील वेष पाहून नेटकरी त्याचं जास्त कौतुक करत आहेत.

 

इतर कलाकारांचा अभिनय

चित्रपटाती सहकलाकारांचा अभिनयदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यात फहाद फासील आणि रश्मिका यांनी उत्कृष्ट अभिनय करत आपली छाप पाडली आहे. पण प्रेक्षकांच्या मनात पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुन सोबत फहाद फासीलचा अभिनय टक्कर देणारा वाटला. तर चित्रपटाचा शेवटदेखील उत्सुकता ताणून धरणारा आहे. चित्रपटाच्या शेवटी ‘पुष्पा 3’ ची देखील हिंट दिली गेलेली आहे.

मात्र काही नेटकऱ्यांना चित्रपट आवडला नाही

काही नेटकऱ्यांना मात्र चित्रपटाला आवडला नाहीये.. चित्रपटात प्रत्येक सीन जास्त खेचण्यात आला आहे, गाणीही उगीच टाकण्यात आली असून चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये काहीही दम नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तसेच पुष्पाचा पहिला पार्टच मस्त होता अशाही कमेंट काहींनी केल्या आहेत.

एकंदरितच बहुतेक प्रेक्षकांना चित्रपट पसंत पडला आहे. अल्लू अर्जुनची क्रेझ पाहता ‘पुष्पा 2’ या वर्षीचा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरणार यात शंका नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा असाच आहे असंही नेटकरी सांगत आहेत. दरम्यान पुष्पाचं क्रेझ पाहता पहिल्या दिवशी चित्रपट 200 कोटींचा आकडा गाठेल असंही म्हणण्यात येत आहे.

 

पुष्पा 2 चा आज (5  डिसेंबर 2024)| रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांनी याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे कौतुक झाले असले तरी, काहींना चित्रपटाची लांबी आणि गाणी जास्त वाटली आहेत. तरीसुद्धा, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांच्या क्रेझमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्याची शक्यता आहे. पुष्पा ३ ची हिंट देखील चित्रपटात देण्यात आली आहे.