अरेरे… ‘पुष्पा 2’च्या चाहत्यांना नाराज करणारी बातमी; चित्रपट रिलीजच्या 2 दिवसांपूर्वीच मोठा निर्णय

| Updated on: Dec 03, 2024 | 7:10 PM

सध्या सर्वत्र 'पुष्पा 2: द रुल' ची क्रेझ पाहायला मिळत आहे. 5 डिसेंबरला 'पुष्पा 2:: द रुल' रिलीज होणार आहे. पण चित्रपट रिलीजच्या 2 दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे चाहते मात्र नक्कीच नाराज होणार आहे.

अरेरे... ‘पुष्पा 2’च्या चाहत्यांना नाराज करणारी बातमी; चित्रपट रिलीजच्या 2 दिवसांपूर्वीच मोठा निर्णय
Follow us on

सध्या सर्वत्र ‘पुष्पा 2:: द रुल’ ची क्रेझ पाहायला मिळत आहे. 5 डिसेंबरला ‘पुष्पा 2:: द रुल’ रिलीज होणार आहे. जवळपास लाखोंच्या संख्येनं चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींग झालेलं आहे.रिलीजच्या आधीच चित्रपटाने करोडो कमावले आहेत. पण चित्रपट प्रदर्शनाच्या 2 दिवसांपूर्वीच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नक्कीच चाहते नाराज होतील.

‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी अजून एक उत्सुकता होती ती म्हणजे की हा चित्रपट 2D सोबतच 3D मध्येही रिलीज होणार आहे. त्यामुळे पुष्पाच्या अॅक्शनपासून ते रोमॅन्सपर्यंत सर्वकाही पाहाण्याचा आनंद आणखी जवळून घेता येणार होता. मात्र आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपट येत्या 5 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे पण फक्त 2D मध्ये प्रदर्शित होणार आहे.

3D आवृत्तीमध्ये हा चित्रपट पहिल्या आठवड्यात तरी रिलीज होणार नाहीये. सोबतच चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी 4 डिसेंबर रोजी मध्यरात्री शो प्रदर्शित होणार नसल्याचंही समोर आलं. याचा अर्थ ज्यांनी हिंदी आवृत्तीत चित्रपटाच्या मध्यरात्रीचा शो पाहायचा ठरवला होता, त्यांचे सगळे बेत आता उद्ध्वस्त झाले आहेत.

त्यामुळे 3D व्हर्जनमध्ये प्रेक्षकांना या चित्रपटाचा आनंद घेता येणार नाहीये. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका पोस्ट करत ही माहिती सांगितली आहे. एक्सवर पोस्ट करत तरण आदर्श यांनी म्हटलं आहे की, ‘पुष्पा 2 ची 3D आवृत्ती या आठवड्यात प्रदर्शित होणार नाहीये.

पुष्पा 2 ची 3D आवृत्ती या गुरुवारी (5 डिसेंबर 2024) प्रदर्शित होणार नाही. फक्त 2D आवृत्ती 5 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होईल. याशिवाय, बुधवारी रात्री (4 डिसेंबर 2024) ‘पुष्पा 2’ च्या हिंदी आवृत्तीसाठी मध्यरात्री शो होणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे 3D व्हर्जनमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद हा पहिल्या आठवड्यात तरी प्रेक्षकांना घेता येणार नसल्याने चाहते नक्कीच नाराज होणार आहेत.

दरम्यान‘पुष्पा 2: द रुल’ची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसह अनेक गाणी प्रदर्शित झाली आहे. ‘अंगारो’, ‘किसिक’ आणि ‘पीलिंग्स’ सारखी गाणी यूट्यूबवर आधीच धुमाकूळ घालत आहेत.