“पुष्पा 2” हा सिनेमा सध्या तुफान गाजतोय. या चित्रपटाने तब्ब ल 1000 करोडचा गल्ला जमवला आहे. तसेच आठवडाभरानंतरही हा चित्रपट थिएटरमध्ये हाऊसफूलच सुरु आहे. “पुष्पा 2” सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावरसुद्धा “पुष्पा 2” चे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्येही चित्रपटातील ‘सामे’ गाण्यावर लोक नाचातानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत यातच आता अजून एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
‘पुष्पा 2’ तो सीन पाहून महिलेच्या अंगात आलं?
‘पुष्पा 2’ पाहायला गेलेली महिला अचानक विचित्र पद्धतीने ओरडू आणि नाचू लागल्या व्हिडीओमध्ये “पुष्पा 2” मधील एक सीन पाहून एक महिला वेड्यासारख्यं ओरडताना दिसत आहेत. त्या खुर्चीवर बसल्याजागी अंगात आल्यासारखं नाचताना दिसत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी महिलांच्या अंगात आलं आहे असं म्हटलं आहे.
“पुष्पा 2” मधील तसे बरेच सीन गाजले आहेत. पण त्यातील एका सीनची बरीच चर्चा आहे. हा 6 सेकंदाचा सीन प्रेक्षक तो विसरू शकत नाहीत आणि हा सीन म्हणजे चित्रपटाचा USP असल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून समजत. तो सीन म्हणजे ‘गंगम्मा जत्रा’सीन. ज्यामध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसत आहे. थिएटरमध्ये जेव्हा हा सीन सुरू होतो तेव्हा तो नक्कीच प्रेक्षकांना अंगावर येणारा वाटतो.
गंगम्मा आरतीचा सीन सुरु होताच महिला नाचू लागली
जेव्हा अल्लू अर्जूनचा गंगम्मा जत्रेचा आणि त्यातील गंगम्मा आरतीचा सीन सुरु झाला तेव्हा ही महिला अचानकच हायपर झाल्याचं पाहायला मिळतंय. ती महिला खुर्चीवर मोठमोठ्याने ओरडत असून नाचताना दिसत आहे. तिला सांभाळण्यासाठी लोकांनी तिला धरूनही ठेवल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये महिला खुर्चीवर बसू शकत नसल्यानं तिला चार लोकांनी पकडून ठेवलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या महिलेच्या अंगात आलंय का? असा सवालही विचारला आहे. या महिलेच्या अशा वागण्याला नेमकं कारण काय हे अजून समोर आलेलं नाही.
सीनसाठी अल्लू अर्जुन आणि मेकर्सची खूप मेहनत
दरम्यान या सीनसाठी अल्लू अर्जुन आणि मेकर्सनी खूप मेहनत घेतली आहे. अल्लू अर्जुनने निळ्या रंगाचा पूर्ण मेकअप, पायात पायघोळ, साडी, भरपूर दागिने आणि हार, कानात झुमके आणि नाकात गोल रिंग घालून सर्वांना आश्चर्यचकित केले. 6 सेकंदाच्या सीनसाठी निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. या सीनमध्ये दाखवण्यात आलेला ‘जत्रा’ देखावा ‘तिरुपती गंगाम्मा जत्रा’ नावाच्या धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे जो तिरुपती येथील मूळ रहिवासी साजरा करतात.