प्यार दिवाना होता हैं… असं नेहमी म्हटलं जातं. अनेक ठिकाणी हे खरं आहे असंही वाटतं. कारण प्रेमासाठी अनेक लोक धर्मातही बदल करतात. या यादीत बॉलिवूडमधील काही अभिनेत्री देखील आहेत. ज्यांनी प्रेमासाठी आपला धर्म बदलला आहे. त्याचबरोबर काहींनी त्यांच्या इच्छेनं धर्म बदलले आहे. अशाच पाच बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल माहिती घेऊयात.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री नगमाचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. त्यानंतर तिनं आपल्या धर्मात परिवर्तन केलं आणि ती ख्रिश्चन झाली.
आयशा टाकियाचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता, मात्र लग्नानंतर तिनं आपला धर्म बदलला आणि ती मुस्लिम झाली. या अभिनेत्रीनं खासदार अबू आझमी यांचा मुलगा फरहानशी लग्न केलं आहे.
लग्नाआधी नरगिस दत्त मुस्लिम होत्या, मात्र लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्विकारला. नर्गिस दत्त संजय दत्तची आई आहेत.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमृता सिंह शीख कुटुंबातून आली आहे. मात्र सैफ अली खानशी लग्ना झाल्यानंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. पण काही वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
शर्मिला टागोर हिंदू कुटुंबातील आहेत मात्र मन्सूर अली खान पटौदीशी लग्नानंतर त्यांनी आपला धर्म बदलून मुस्लिम झाल्या. लग्नानंतर त्यांचं नाव आयशा सुलताना असं आहे.