मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. मुंबईत ते दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत तेव्हापासून त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच लवकरच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची एंगेजमेंट होणार असल्याचं म्हटलं जातंय. अशातच आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.
एंगेजमेंटच्या चर्चा सुरू असतानाच राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. हे दोघं आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं.
परिणीती आणि राघव चड्ढा स्टेडियममध्ये एकत्र दिसले तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. तसंच सध्या या दोघांचे स्टेडियममधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव चड्ढांनी एकाच रंगाचे कपडे परिधान केलेले दिसत आहेत. तसंच दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.
मार्चमध्ये परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे एकत्र डिनरसाठी स्पॉट झाले होते. तेव्हापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर दोघंही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, अद्याप या दोघांपैकी कोणीही या नात्याला दुजोरा दिलेला नाही.
मागील काही दिवसांपासून परिणीती आणि राघव यांच्या एंगेजमेंटच्या चर्चा होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही याच महिन्यात एंगेजमेंट करणार आहेत. तसंच त्यांच्या एंगेजमेंटची तारीखही समोर आली आहे. असं म्हटलं जातंय की, 13 मे रोजी राघव-परिणीती यांची एंगेजमेंट होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.