बॉलिवूड अभिनेता राहुल देवचा (Rahul Dev)कन्नड चित्रपट ‘कब्जा’ लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राहुल प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. त्याच्यासोबत श्रिया सरन, उपेंद्र आणि किचा सुदीप दिसणार आहेत. नुकतेच राहुल देव यांनी मुलाखती( Interview) दरम्यान बोलताना सिंगल पॅरेंट (Single parent)बद्दलचे त्यांचे मत व्यक्त केले त्याने सांगितले की, एकट्याने मुलाला वाढवणे हे खूप अवघड काम आहे, हे सांगतांना ते भावूक झाले.
अभिनेता राहुल देव यांची पत्नी रीना देव यांचे 2009 मध्ये निधन झालेआहे . अलीकडेच राहुल देव यांनी सिंगल फादर म्हणून त्यांचे अनुभव शेअर केले. राहुल देव यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, ‘पालकत्व अजिबात सोपे नाही. मुलांचे संगोपन करण्यात, त्यांचे संगोपन करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. ती मुलांच्या समस्या ऐकून घेते आणि नीट समजून घेते.
आईमध्ये मुलांसाठी किती संयम असतो, हे मी अनेकवेळा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खूप काही केलं पण कधीतरी असं व्हायचं की माझा संयम सुटायचा. मला त्याच्यासाठी आई आणि वडील दोन्ही बनण्याचा प्रयत्न करावा लागला. मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलाच्या शाळेतील पालक शिक्षकांच्या बैठकीला जायचो तेव्हा बहुतेक मुलांच्या आई तिथे येत असत. जे पाहून मला खूप असुरक्षित वाटायचे.
तो काळ अडचणींनी भरलेला होता, मला ते दिवस अजिबात आठवायचे नाहीत. माझ्या बाबतीत जे घडले ते कोणाचेही बाबतीत होऊ नये. असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात आयुष्य जगताना गोष्टी चित्रपटात दाखवल्या जातात तितक्या सोप्या नसतात. एखाद्याला जोडीदार नसेल तर काही वेळाने तो पुन्हा नव्याने सुरुवात करतो, असे चित्रपटांमध्ये दाखवले जाते, पण प्रत्यक्षात पुन्हा सुरुवात करणे अजिबात सोपे नसते.असेही ते म्हणाले.