मुंबई – हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सुभोध भावे (Subodh Bhave) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची मुलाखत घेतलीय. या चित्रपटात राज ठाकरे यांचाही हिस्सा असल्याने त्यांनी ही मुलाखत भावे यांना दिली आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी बाळसाहेबांचे देखील अनेक किस्से सांगितले आहे. मात्र याच वेळी माझं पॅशन काय तर चित्रपट बनविणे हे माझं पॅशन आहे. मात्र ते आता मी बनवू शकत नाही, आता मात्र चित्रपट पाहू शकतो असे म्हणत चित्रपट बनविण्याची खंत बोलून दाखविली आहे. राज ठाकरे हे विविध विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. मात्र, चित्रपट बनविण्याच्या विषयी त्यांनी बोलून दाखवलेली खंत चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या काळात केलेल्या फिल्मच्या व्हॉईसवेळी घडलेला किस्सा देखील राज ठाकरे यांनी सांगितला आहे.
हर हार महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची आज जाहीर मुलाखत अभिनेता सुभोढ भावे घेत आहे.
राज ठाकरे यांनी यावेळी त्यांचे पॅशन काय यावर स्पष्टपणे सांगत व्हॉईस देणं किती कठीण असतं हे सांगून टाकलंय.
चित्रपट बनविणे हे माझं पॅशन आहे मात्र ते मी आता करू शकत नाही फक्त पाहू शकतो असे म्हणत राज ठाकरे यांनी चित्रपट बनविण्याची खंत बोलून दाखवली.
याशिवाय एक फिल्म केली होती टीओ निवडणूक आयोगाने रद्द करून टाकली, म्हणाले खूपच अंगावर येते त्यामुळे ती समोर आली नाही.
याशिवाय शिवसेनेचे एक कॅम्पेन केलं होतं, त्यात नऊ फिल्म केल्या होत्या त्यात फक्त मुंबई या नावाचा व्हॉईस दिला होता. असं राज म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांना दाखवायला गेलो त्यावेळी त्यांनी त्या पाहिल्या नंतर विचारलं हा मुंबई आवाज कुणाचा त्यावेळी अजित बोरे म्हणाले राजाचा.
त्यानंतर बाळासाहेबांनी सांगितले या सगळ्या फिल्म ला आता तू व्हॉईस द्यायचा, म्हंटल सगळं झालंय आता पुन्हा सगळं नव्याने करायचे ? पण त्या फिल्म नंतर मी केल्या.
व्हॉईसचे काम खूप सोप्पं असतं असे नाही, ऱ्हस्व-दीर्घ असे असे सगळंच बघायचे असते. त्यात अजित यांनी मला सगळं शिकवलं, असं राज ठाकरे म्हणाले.
एकूणच चित्रपट बनविणे याबद्दल असलेले किस्से राज यांनी सांगत आपली आवड चित्रपट बनविणे असल्याचे स्पष्ट केले आहे.