सुपरस्टार अभिनेते, थलाइवा रजनीकांत यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. मूळ मराठी असलेल्या रजनाकांत यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही रजनीकांत यांचा बोलबाला आहे. सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणून त्यांची ख्याती आहे. तमिळ सिनेमांप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. रजनीकांत यांनी गोविंदा, अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. त्यांचे अनेक हिंदी चित्रपट आहेत. पण बरेच हिंदी चित्रपट प्रदर्शितही झालेले नाहीत. त्यामागे काही महत्त्वाची कारणं होती. रजनीकांत यांचे कोणते हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत, यावर टाकलेला हा प्रकाश.
या चित्रपटात शम्मी कपूर, विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांसारखे मोठे कलाकार होते. रजनीकांत देखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
रजनीकांत, शत्रुघ्न सिन्हा, अनिता राज, अमरीश पुरी, प्रेम चोपड़ा आणि सुषमा सेठ यांची भूमिका असलेला टकराव कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यातील काही वादामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.
रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, सुजाता मेहता आणि परेश रावल यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबतचा रजनीकांत यांचा हा सिनेमाही प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट “गंगा जमुना सरस्वती” सारखा दिसत होता आणि त्यामुळे तो कधीच प्रदर्शित झाला नाही.
रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटालाही रिलीज होण्याचा मुहूर्त सापडला नाही. या चित्रपटाची शुटिंग अर्ध्यावरच बंद पडल्याचं सांगितलं जातं.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती बी. सुभाष यांनी केली होती. चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण झाले होते. परंतु काही कारणांमुळे तो चित्रपट पूर्णपणे बंद झाला आणि प्रदर्शित होऊ शकला नाही.