योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन – राखी सावंत

| Updated on: Dec 29, 2023 | 2:08 PM

राखी सावंत आणि वाद, किंवा कॉन्ट्रोव्हर्सी हे जुनं समीकरण.. सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते राखी.. व्हिडीओत राखीने केली घोषणा.. योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहणार.. बँकरप्ट झाल्याचेही राखीचे विधान

योग्य पार्टनर मिळेपर्यंत लग्न करतच राहीन - राखी सावंत
Follow us on

Rakhi Sawant : राखी सावंत आणि वाद, किंवा कॉन्ट्रोव्हर्सी हे जुनं समीकरण आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. आता राखी सावंत हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल बरचं काही वक्तव्य केलं आहे. ‘मी बँकरप्ट (दिवाळखोर) झाले आहे ‘ असं राखीने एका मुलाखती दरम्यान सांगितलं. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेली राखी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहे. कधी ती तिच्या एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत येते तर कधी तिच्या पतीसोबतच्या भांडणामुळे.

आता तिचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात तिने पती आदिलबद्दलही बरेच खुलासे केले आहेत. तसेच आपण बँकरप्ट झालोय, असेही तिने स्पष्टपणे कबूल केलं आहे. राखीच्या या नव्या व्हिडीओमुळे एकच खळबळ माजली आहे.

आदिल पैसे घेऊन गेला

Filmgyan ला दिलेल्या मुलाखतीत राखी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही बोलली. सध्या तुझ्याकडे काही काम नाहीये, मग तुझा उदरनिर्वाह कसा चालतो ? असा प्रश्न राखीला विचारण्यात आला. तेव्हा राखी म्हणाली ‘ सध्या तरी मी बँकरप्ट आहे. माझ्याकडे आत्ता सोर्स ऑफ इनकम (कमाईचा काहीच स्त्रोत नाही) नाहीये. माझा नवरा आदिल दुर्रानी सगळे पैसे घेऊन गेला. कोर्ट मला माझे सगळे पैसे परत मिळवू देईल आणि घटस्फोटही मिळले अशी मला आशा आहे. (म्हणजे) येत्या काळाता मी एक चांगला पार्टनर शोधून लग्न करू शकेन, ‘ असं राखी म्हणाली.

मै तबतक शादी करती रहूंगी..

राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यातील वाद जगजाहीर आहे. त्यांच्यात काहीच आलेबल नसून ते एकमेकांपासून लवेगळे रहात आहेत. घरगुती हिंसाचाराप्रकरणी कोर्टात केसही सुरू आहे. त्याशिवाय राखीचा पती आदिल जेलवारीही करून आला आहे. तिने त्याच्यावर बरेच आरोप लावले होते. सध्या ते वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत.

आयुष्यात इतक्या अडचणी येऊनही राखीने धीर सोडलेला नाही. मला जोपर्यंत चांगला, माझ्यावर प्रेम करणारा पार्टनर मिळणार नाही, तोपर्यंत मी लग्न करतच राहीन. मै तबतक शादी करती रहूंगी अशी घोषणाच राखीने केली. हे माझंआयुष्य आहे, ते आपल्याला एकदाच मिळतं, त्यामुळे मी चांगला पार्टनर मिळेपर्यंत, लग्न करत राहीन, असा पुनरुच्चार राखीने केला.

बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध

राखी सावंत अनेकदा कोणत्या ना कोणत्या विषयावर बिनधास्तपणे बोलताना दिसते. इतकंच नाही तर ती स्वतःबद्दल उघडपणे बोलायलाही कमी पडत नाही. आता राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने चाहते आश्चर्यचकित झाले असून ते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. तर लोकांनी राखी सावंतची खिल्लीही उडवली आहे. अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत. पण राखी तिच्या मुद्यावर ठाम उभी आहे.