मुंबई : ‘बिग बॉस 14’मधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) सतत काहीना काही कारणाने चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत राहते. आता नुकताच राखीचा एक व्हिडीओ समोर आला असून, तो तिच्या कलर्सच्या होळी कार्यक्रमातला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत वैतागलेली दिसत आहे. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच राखीच्या ब्लाऊजची दोरी तुटली होती, यामुळेच ती संतापलेली होती (Rakhi Sawant Colors holi celebration wardrobe malfunction).
व्हिडीओमध्ये राखी म्हणते, ‘मी अद्याप एकही मूव्ह केलेली नाही आणि माझ्या ब्लाऊजची अवस्था पाहा. आता मी कसे काम करू? कोणत्या प्रकारची दोरी याला लावली गेली होती? आता मी सेफ्टी पिन लावून काम करावे का? मला सांगा आता मी काय करू? आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आम्ही कलाकार आहोत, आपण कपडे व्यवस्थित तयार केले गेले पाहिजेत.’
राखी पुढे म्हणते, ‘मग लोक म्हणतात की, आम्ही उगाच कॉन्ट्रोवर्सी करतो. आम्ही स्वतःच आमच्या ब्लाऊजची दोरी तोडू का? आता माझे संपूर्ण युनिट तिथे थांबलेले आहे. हे कलाकारांच्या बाबतीत नेहमीच घडते.’
‘ड्रामा क्वीन’ अभिनेत्री राखी लवकरच वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. वास्तविक, राखीने नुकतीच सांगितले की, ती ‘तवायफ’ या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरीजचे दिग्दर्शन मारुख मिर्झा करत आहेत. यातील आपल्या लूकची एक झलकही राखीने शेअर केली होती. व्हिडीओमध्ये राखी म्हणते, ‘तू काय करतोस? तू वेडा झाला आहेस, नजर लागेल..’
राखीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, लवकरच तिच्या आयुष्यावर बायोपिक बनणार आहे. या बायोपिक अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपली भूमिका साकारावी अशी राखीची इच्छा आहे. राखी म्हणाली, ‘आलिया भट्ट माझ्या व्यक्तिरेखेसाठी परिपूर्ण आहे. याशिवाय राधिका आपटेदेखील माझे पात्र उत्तमरीत्या साकारू शकते.’ (Rakhi Sawant Colors holi celebration wardrobe malfunction)
राखी सावंत हिच्या मते, तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तिची व्यक्तिरेखा अशा अभिनेत्रीने साकारली पाहिजे, जी धाडसी स्वभावाची आहे. अशा परिस्थितीत आलिया भट्ट आणि राधिका आपटे एक चांगला पर्याय वाटत आहे. कारण धाडसीपणा आणि बोल्डनेस त्यांच्या रक्तात आहे. त्यांना कोणाचीही भीती वाटत नाही.’
लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर यांनी स्वत: एका मुलाखतीत राखी सावंत यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार असल्याची पुष्टी केली होती. त्यांनी सांगितले होते की, ‘मी राखी आणि मला चार-पाच वर्षांपूर्वी विमानात भेटलो होतो. तेथे त्यांनी मला स्वतःच्या बालपणाची कहाणी सांगितली आणि त्यावर मी त्यांना सांगितले की, एखाद्या दिवशी मला त्यांच्या जीवनावर स्क्रिप्ट लिहायला आवडेल.’
आता राखीचा बायोपिक बनणार आहे की नाही, आणि तो बनवला तर त्यात कोणती अभिनेत्री राखीची भूमिका साकारणार, ते पाहणंदेखील मनोरंजक ठरणार आहे.
(Rakhi Sawant Colors holi celebration wardrobe malfunction)
पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?